google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेकापचे नेते, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Breaking News

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेकापचे नेते, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 सांगोला येथे शेकापचा भव्य मोर्चा


शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेकापचे नेते, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.


सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या वीज तोडणी अभियानाच्या विरोधात तसेच पीक विमा संदर्भातील जाचक अटी शिथिल करून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत करावी. पाण्यापासून वंचित असलेल्या गावाचा सर्वे करून त्या गावांचा विविध सिंचन योजना मध्ये समावेश करून त्या गावांना पाणी उपलब्ध करून द्यावे. सामाजिक संतुलन राखण्यासाठी धनगर, मुस्लीम, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी त्वरित मान्य करावी. तसेच ओ बी सी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत. 


ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना नियमित करावी. केसरी रेशन कार्ड धारकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करावा. चारा छावण्यांची रखडलेली बिले त्वरीत द्यावीत. अशा विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उद्या 14 मार्च रोजी महात्मा फुले चौक सांगोला ते तहसील कार्यालय सांगोला असा भव्य मोर्चा निघणार आहे.


या मोर्चाचे नियोजन पुरोगामी युवक संघ सांगोला तालुका व शेतकरी कामगार पक्ष सांगोला तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून हा मोर्चा पुरोगामी युवक संघाचे राज्याध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, शेकाप नेते चंद्रकांत दादा देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वात निघणार आहे.


हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी दादा शेठ बाबर, एड. भरत बनकर, बाळासाहेब पाटील, शंकर शेठ पाटील, दीपक गोडसे, संजय मामा गोडसे, हरी भाऊ शेठ येडगे, कल्याण लूबाळ, महादेव मामा येळे इत्यादी नेते परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments