google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : ' त्या ' चिठ्ठीने फोडले पोलिसांचे बिंग ?

Breaking News

सोलापूर : ' त्या ' चिठ्ठीने फोडले पोलिसांचे बिंग ?

सोलापूर : ' त्या ' चिठ्ठीने फोडले पोलिसांचे बिंग ?

 उत्तर सोलापूर :  उत्तर तालुका पोलिसांना जुगार अड्डा व अवैध धंदे सुरू ठेवण्याकरिता पोलिसांना देण्यात येणार्‍या रकमेच्या आकडेवारीची चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.या चिठ्ठीमध्ये तालुका पोलिस ठाण्यासंबंधात काही रकमेचे आकडे नमूद केले आहेत. महिन्याकाठी पोलिसांना देण्यात आलेल्या रकमेच्या हिशोबाच्या चिठ्ठीने पोलिसांचे पितळ उघडे पडले. पोलिसांविषयी नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.


ही चिठ्ठी कोंडी परिसरातील असल्याचे बोलले जात आहे. कोंड गावामध्ये जुगाराचे अड्डे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. परिसरातील एका हॉटेलमागे जुगाराचा अड्डा असल्याचे बोलले जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. या चिठ्ठीत एका सहायक पोलिस निरीक्षकाच्या नावापुढे पाच हजार रुपयांची रक्कम लिहिली आहे, तर एकूण 67 हजार रक्कम पोलिसांना जात असल्याचे व्हायरल चिठ्ठीत लिहिले आहे.


सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या ऑपरेशन परिवर्तन मोहीम राबवत हातभट्टी दारू निर्मितीला आळा घालत आहेत. तरीही गावोगावी 7 ते 8 हातभट्टी दारू दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. या व्हायरल चिठ्ठीवर ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते संबंधित पोलिस अधिकारी व पोलिसावर कोणती कारवाई करणार, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. 


बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानसभेत पोलिस प्रशासनावर जिल्ह्यातून हप्ता कसा गोळा केला जातो याचा पाढाही वाचून दाखविला होता. तर, चिठ्ठीवर नाव असणार्‍या सहायक पोलिस अधिकारी दळवे यांना विचारले असता, कोणीतरी खोडसाळपणाने या चिठ्ठीवर माझे नाव घातले आहे, मी काही दिवसांपूर्वीच रजा घेतली असल्याचे त्यांनीे सांगितले.


चिठ्ठीबाबत अजून आम्ही चौकशी केली नाही. त्याबाबत कोणीही तक्रार दिलेली नाही. पुरावा असल्यास समक्ष येऊन तक्रार द्यावी.

– हिंमतराव जाधव

अप्पर पोलिस अधीक्षक

गावोगावी जुगार व अवैध धंदे करणार्‍यांची माहिती पोलिसांनी गोळा करावी. गावातून पोलिसांना चिरीमिरी गोळा करून देणारे व अवैध धंद्यांच्या माध्यमातून खबर्‍या म्हणून झीरो पोलिस गावोगावी आहेत त्यावरही पोलिस अधीक्षक सातपुते यांनी कारवाई करावी.

– विष्णू जगताप

मार्डी नागरिक

Post a Comment

0 Comments