500 रुपयांच्या नोटबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या माहिती अन्यथा बसेल लाखोचा फटका
सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 500 च्या दोन नोटांमधील फरक सांगितला जात आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
नवी दिल्ली : गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कमी वेळेत जास्त पैसे कमवण्यासाठी अनेक अवैध मार्ग पत्करतात. त्यात बनावट नोटा छापून बाजारात आणणारे देखील आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 500 च्या दोन नोटांमधील फरक सांगितला जात आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
कशी ओळखायची 500 ची नोट ?
RBI ने पैसे बोलता है या साईटवर ही 500 ची नोट ओळखण्यासाठी 17 मुद्दे दिले आहेत या मुद्द्यांच्या मदतीने तुम्ही 500 ची नोट सहज ओळखू शकाल.
नोट उजेडासमोर ठेवल्यास या ठिकाणी 500 लिहिलेले दिसतील. 45 अंशाच्या कोनातून नोट डोळ्यासमोर ठेवल्यास या ठिकाणी 500 लिहिलेले दिसेल. या ठिकाणी देवनागरीत 500 लिहिलेले दिसेल. महात्मा गांधींचे चित्र अगदी मध्यभागी आहे. भारत आणि India ही अक्षरे लिहिलेली दिसतील. जर तुम्ही नोट थोडी दुमडली तर सिक्युरिटी थ्रेडचा रंग हिरव्यापासून इंडिगोमध्ये बदलताना दिसेल.
या मॅसेज मागील सत्य?
बनावट आणि खरी नोट यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता. संबधित मॅसेजमध्ये हिरव्या रंगाची तुटक पट्टी गवर्नरच्या सहीवर असल्यास ती नोट खोटी आहे असं म्हटलंय. पीआयबी फॅक्ट, चेकनुसार हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. दोन्ही प्रकारच्या नोटा पूर्णपणे वैध आहेत. त्यामुळे याबाबतीत कोणत्याही संभ्रमात राहू नका. पीआयबी फॅक्ट चेकने त्याच्या सोशल अकाउंटवर त्याच्याशी संबंधित लिंक देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये आरबीआयने संबंधित माहिती दिली आहे.
500 क्रमांकाचा रंग बदलतो.
जुन्या नोटेच्या तुलनेत गव्हर्नरची स्वाक्षरी, गारंटी क्लॉज, प्रॉमिस क्लॉज आणि RBI लोगो उजव्या बाजूला सरकले आहेत. येथे महात्मा गांधींचे चित्र आहे आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क देखील दिसेल. वरच्या बाजूला डावी बाजू आणि तळाशी उजवीकडे संख्या डावीकडून उजवीकडे मोठी होते. येथे लिहिलेल्या 500 क्रमांकाचा रंग बदलतो. त्याचा रंग हिरव्यापासून निळ्यामध्ये बदलतो. उजवीकडे अशोक स्तंभ आहे. स्वच्छ भारतचा लोगो घोषवाक्यासह छापलेला आहे. मध्यभागी एक भाषा फलक आहे. भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचे चित्र छापलेले आहे. देवनागरीमध्ये 500 प्रिंट्स आहेत.
0 Comments