google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढा ब्रेकिंग! मंगळवेढ्यातील 'या' जंगलात अडवून तिघांवर सशस्त्र हल्ला; तलवारीने हात-पाय तोडले

Breaking News

मंगळवेढा ब्रेकिंग! मंगळवेढ्यातील 'या' जंगलात अडवून तिघांवर सशस्त्र हल्ला; तलवारीने हात-पाय तोडले

 मंगळवेढा ब्रेकिंग! मंगळवेढ्यातील 'या' जंगलात अडवून तिघांवर सशस्त्र हल्ला; तलवारीने हात-पाय तोडले 

लवंगी-मारोळी (ता.मंगळवेढा ) येथील वनक्षेत्रात जाडरबोबलाद (ता.जत) येथील दोघा भावांसह तिघांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला. तलवारीने वार धरून बसलेल्या करीत हात-पाय तोडण्यात आले. जंगलात दबा हल्लेखोरांनी कोणत्यातरी अज्ञात कारणावरून हा हल्ला केल्याचे समोर येत आहे.


रविवारी रात्री ही घटना घडली. जखमींमध्ये विठ्ठल रामचंद्र बरूर , दयानंद मल्लेशप्पा बरूर व महादेव रामचंद्र बरूर (तिघेही,रा. जाडरबोबलाद ) यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लवंगी-मारोळी व जाडरबोबलाद दरम्यान वन विभागाची जागा आहे. जंगल असल्याने नेहमीच हा परिसर निर्जन असतो, रविवारी विठ्ठल बरूर , दयानंद बरूर व महादेव बरूर हे तिघे एकाच दुचाकीवरून नंदूर येथे एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते.


अंत्यविधी आटोपून परत येत असताना वनक्षेत्रात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांना अडवून तलवारीने हल्ला चढविला. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उमदी व मंगळवेढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत उमदी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

Post a Comment

0 Comments