google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात शिवसेनेत राडा ; शिवसेना नेत्याला मारहाण? काय घडले हुतात्मा स्मृती मंदिर समोर

Breaking News

सोलापुरात शिवसेनेत राडा ; शिवसेना नेत्याला मारहाण? काय घडले हुतात्मा स्मृती मंदिर समोर

 सोलापुरात शिवसेनेत राडा ; शिवसेना नेत्याला मारहाण? काय घडले हुतात्मा स्मृती मंदिर समोर

सोलापूर : सोलापुरात सोमवारी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा "निश्चय दौरा" होता. त्याचाच 'हुतात्मा स्मृती मंदिर येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास वरून सरर्देसाई यांचं सोलापुरात आगमन झाले कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केलं. याच दरम्यान हुतात्मा स्मृती मंदिराच्या बाहेर एका शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती आहे. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेला होता परंतु शिवसेनेतील नेत्यांनी एकत्रित येऊन वाद वाढू दिला नाही अशी माहिती मिळत आहे. 


याबाबत अधिक माहिती घेतली असता समजले की एका ज्येष्ठ नेत्याने आपली गाडी हुतात्मा स्मृती मंदिर समोर लावली होती ती गाडी काढण्यावरून त्यांना काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. एकीकडे अशी माहिती मिळताना दुसरीकडे माहिती मिळाली की त्या नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे मग  त्याचे या मेळाव्यात काय काम असे म्हणून कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी मारहाण केली असेही माहिती समोर येत आहे.


 दरम्यान बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना ही माहिती मिळताच हा वाद सदर बजार पोलिसांपर्यंत गेला, याप्रकरणी वाद वाढू नये म्हणून शिवसेनेचे सर्व नेते पोलीस ठाण्यात गेले, आणि हा वाद वाढू दिला नाही. यापूर्वी युवा सेनेचे एक पदाधिकारी शासकीय विश्रामगृहावर आले असता त्या ठिकाणी सुद्धा दोन गटामध्ये गोंधळ होऊन तो दौरा अर्धवट सोडून ते नेते मुंबईकडे रवाना झाले होते त्यानंतर पुन्हा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात राडा झाला.

Post a Comment

0 Comments