google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ऊसतोड मुकादमाचे अपहरण करुन शिर धडावेगळे करत निर्घृण खून

Breaking News

ऊसतोड मुकादमाचे अपहरण करुन शिर धडावेगळे करत निर्घृण खून

 ऊसतोड मुकादमाचे अपहरण करुन शिर धडावेगळे करत निर्घृण खून 

केज : केज तालुक्यातील लव्हुरी येथील ऊसतोड मुकादमाचे अपहरण करुन शिर धडावेगळे करत निर्घृण खून  केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अपहरण कर्त्यांनी मुकादमाच्या कुटुंबाकडून खंडणीची मागणी देखिल केली होती. अखेर अपहरण कर्त्यांनी मुकादमाचा खून केला. आरोपींनी मुकादमाचे धड कोल्हापूर जिल्ह्यातल्या हिरण्यकेशी नदीत फेकून दिले. तर शीर हे घटनास्थळापासून १० किलोमीटर अंतरावर फेकून देत मृतदेहाची विल्हेवाट लावली.


 या घटनेचा तपास करत केज पोलिसांनी मृतदेहाचे धड शोधण्यात यश आले तर शिराचा शोध अद्याप सुरु होता.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी नातेवाईकांनी चाळक बेपत्ता झाल्याची तक्रार दि. २५ रोजी दाखल केली होती. दि.२७ रोजी त्यांचा भाऊ व मुले यांना चाळक यांच्या फोनवरून अज्ञात अपहरणकर्त्यांनी फोन केला. अपहरणकर्त्यांनी सुधाकर चाळक यांच्या सुटकेसाठी १२ लाख रुपयांची मागणी केली. अपहरणकर्ते हे हिंदी भाषेत बोलत होते व शिवीगाळ करीत होते. सुटकेसाठी ते कर्नाटक येथील शंकेश्वर साखर कारखान्यावर पैसे घेऊन येण्याची मागणी करीत होते. जर पैसे आणून दिले नाहीत तर कापून टाकू व जीवे मारू अशी धमकी त्यांनी फोनवरून दिली होती. 


अक्षय चाळक याने त्याचे वडील सुधाकर चाळक यांचे अज्ञात अपहरणकर्त्यांनी अपहरण करू मारहाण करून पैशासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दि. २८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला. सर्व माहिती व कॉल रेकार्डची माहिती घेऊन सीडीआर वरून पोलिसांनी संशयित आरोपी तुकाराम मुंडे ( रा.चारदरी, ता. धारूर, जि. बीड), रमेश मुंडे (रा. कोठरबन, ता. वडवणी, जि. बीड) दत्तात्रय हिंदुराव देसाई (वय ५८ वर्ष, रा. कडगाव, ता. भुदरगड, जि कोल्हापूर) यांना ताब्यात घेऊन तपास केला. 


यावेळी आरोपी दत्तात्रय हिंदुराव देसाई याने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले की, सुधाकर चाळक यांचा खून करून त्याचे मुंडके धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्यासाठी ते धड पोत्यात बांधून कोल्हापूर जिल्ह्यातील नांगनूरजवळ हिरण्यकेशी नदीत फेकले व शिर तिथून पुढे १० किमी अंतरावर पाण्यात फेकले. संशयितांना घेऊन पोलिस नांगनूरच्या हिरण्यकेशी पुलावर सोमवारी दाखल झाले. त्यांनी गडहिंग्लजच्या रेस्क्यू टीमच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेतला. सोमवारी (दि. १४) मध्यरात्री नदीपात्रात मृतदेह सापडला. मात्र मंगळवारी (दि.१५) सायंकाळी पर्यंत पणबुड्यांच्या मदतीने ते मुंडक्याचा शोध सुरूच होता. 


सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे यांनी केलेल्या अथक प्रयत्न आणि तपासामुळे नियोजनपूर्वक अपहरण करून पुरावा नष्ट केलेल्या खुनाचा उलगडा झाला आहे. केज पोलीस ठाण्यात सुधाकर चाळक यांच्या खून प्रकरणी खुनाचा व पुरावा नष्ट करणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments