Breaking News

सोलापूर – सांगोला शेतकऱ्यांची वीजबिले सरकारने माफ करावीत–डाँ बाबासाहेब देशमुख..

 सोलापूर – सांगोला शेतकऱ्यांची वीजबिले सरकारने माफ करावीत–डाँ बाबासाहेब देशमुख..

 

सांगोला तालुका आणि परिसरात संपुर्ण राज्यातील शेतकरी सध्या विजबीलाच्या वसुलीने पुरते हैराण झाले आहेत.अशा वीजबिलाच्या वसुलीच्या तगाद्याने पंढरपुर तालुक्यातील मगरवाडी गावातील सुरज नामक तरुण शेतकऱ्यांने विष प्राशन करुन स्वताला संपवुन घेतले.व त्याबाबतचा एक धक्कादायक व्हिडीओ सुध्दा सर्वत्र व्हायरल झाला त्या मध्ये तो तरुण शेतकरी आसे बोलतोय की पुंन्हा शेतकर्याचा जन्म नको ही यातना ऐंकुन खरच मनात चलबिचल निर्माण होते.


शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे मग अशा ह्या अन्नदात्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते आहे हे शेतकऱ्यांच्या दृष्ठीने दुर्भाग्यपुर्ण आहे. सद्या देशात शेतकरी असी अवस्था आहे कुठलेही पिक घ्या त्या पिकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावरती खुप परीणाम होत आहे ऊत्पादन घटले आहे.समजा त्यातुनही शेतकर्यांने काही प्रमाणात ऊत्पादन काढलेच तर ..उत्पादन खर्चाच्या आधारावर शेतीमालाला हमी भाव नाही.त्यामुळे शेतकरी पुरता आर्थीक संकटामध्ये सापडलेला आहे.शेतात पिक नाही आणी समजा पिक आसलेच तर त्यापासुन खर्चही निघत नाही.आशा कठीण परस्थीतीमध्ये जर शेतकर्यांना विजबीलाच्या वसुलीसाठी तगादा लावला कींवा विज तोडली तर आहे ती पिके सुध्दा हातातुन जात आहेत आशा आवस्थेत शेतकर्याला योग्य ती मदत करण्याची पुर्णता जबाबदारी सरकारची आसुन ही सरकार विजबीलाची सक्तीने वसुली करते आहे हे योग्य नाही


आपण सगळेच जण आता कुठे लाँकडाऊनधुन बाहेर पडलो आहोत गेले दोन वर्षाहुन जास्त काळ हा आपला ऐवढा आडचणीचा गेला आहे की सर्व काही ठप्प झाले होते शेती उत्पादनात घट,व्यवसाय बंद,काम धंदा नाही आशा आवस्थेत आपण कोरोनासारख्या महाभयंकर रोगाशी धैर्यांने मुकाबला करुन आपल्या संसाराचा गाडा कसाबसा चालवत आपण इथ पर्यंत आलो आहोत.


आता कुठे सर्व काही सुरळीत चालु होण्याच्या मार्गावर आसताना व एवढेमोठे संकट येऊनही आता कुठे लोकांच्या शेतकर्यांच्या व्यवसाईकांच्या चेहर्यावर आनंदाचे हास्य निर्माण होते आहे आसे वाटत आसताना.सरकारने पुंन्हा विजबिलाची सक्तीची वसुल व विज तोडणी सुरु करुन पुंन्हा एकदा सामांन्यांचे हास्य हिरावुन घेण्यास सुरवात केली आहे.एकतर सरकार शेतकर्यांना विज कीती तास व कोणत्या वेळेस देते ह्याचा कधीच विचार केला आहे का?


रोज आठ तास वीज देता ती ही पुर्ण क्षमतेने नाही व सोळा तास वीज बंद ठेवत आसाल तर शेतकर्यांनी कीती तासाचे विज बील भरायचे ? ह्या गोष्टीचा सरकार म्हणुन विचार होणार आहे की नाही .


मोठमोठ्या शहरामध्ये उंचच्या उंच ईमारतीमध्ये मोठमोठ्या पंचतारांकीत हाँटेलमध्ये,श्रीमंताच्या महालामध्ये झगमगाट करण्यासाठी आत्याधुनीक उपकरणे वापरासाठी वारेमाप वीजेचा वापर सर्रास केला जातो आमची त्या वापराला हरकत नाही परंतु ग्रामीण भागातील शेतकर्याला छोट्यामोठ्या व्यवसाईकाला जर पुर्ण क्षमतेने सोवीतास विज दिली तर झगमगाटासाठी वापरणार्या विजेला आमची हरकत नाही परंतु ग्रामीण भागाचाही विजेबाभत गांभीर्याने विचार सरकारने करायला हवा.ऊगीचच उठसुठ शेतकर्यांच्या मागे ससेमीरा लावणे योग्य नाही.


कर्जबाजारीपणाला कंटाळुन आनेक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत ही बाब आपणा सर्वांनसाठी लाजीरवाणी आहे.आशातच विजेच्या बीलापाई पंढरपुर तालुक्यातील मगरवाडी गावातील एका सुरज नावाच्या तरुण शेतकर्यांने आत्महत्या करावी ही आतीशय गंभीर व क्लेशदायक घटना आहे.महाराष्ट्र सरकारनेही ह्या गोष्टीचा गांभिर्याने विचार करावा माझी ही शेतकरी बांधवांना विनंती आहे आपण आर्थीक आडचणीत जरी आसलो तरी स्वताच्या जिवाचे बरेवाईट करणे हा यावरती उपाय नव्हे आपण ही आशा प्रकारचे चुकीचे पाऊल न ऊचलता शांत संयमी वृत्तीने व धैर्याने आपल्या कुटुंबाच्या गावाच्या भल्यासाठी योग्य दिशेने वाटचाल केली पाहीजे त्याच बरोबर राज्यातील शेतकर्यांच्या विजबीलासंदर्भात राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकर्यांचे विजबील माफ करावे आशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सतापे यांनी दिली

Post a Comment

0 Comments