Breaking News

धक्कादायक: पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून 30 वर्षीय नवविवाहितेने केली गळफास घेऊन आत्महत्या….

 धक्कादायक: पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून 30 वर्षीय नवविवाहितेने केली गळफास घेऊन आत्महत्या…. 

गोंदिया, जिल्ह्यातील आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ग्राम ठाणा येथील 30 वर्षीय दीपाली या महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. चार महिन्या आधीच दीपाली ही गंधर्व विवाह करून आली होती. मात्र दिपालीची ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत दिपालीच्या कुटंबीयांनी केला आहे त्यामुळे पोलिसांनी या घटनेला कारणीभूत असलेला प्राध्यापक पती आणि त्याची वहिनी या दोघांना अटक केली आहे.


हरिहर भाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय चिरचालबांध (ता. आमगाव) येथे प्राध्यापक असलेल्या पतीचे पहिल्या पत्नीचा कोरणाच्या दुसऱ्या लाटेत दुःखद मृत्यू झाल्याने व दोन लहान चिमुकल्या मुलांचा (5 वर्ष व 8 वर्ष) सांभाळ करण्यासाठी प्राध्यापक महोदयांनी कुटुंबातील व्यक्तींच्या म्हणण्यानुसार चारच महिन्या आधी दीपाली या महिलेशी गंधर्व विवाह केला होता. मात्र पहिल्या पत्नीच्या मृत्यू नंतर प्राध्यापक आणि त्यांची वहिनी यांच्यात सुरू झालेले अनैतिक संबंध दीपालीला माहित झाल्यावर त्यातून होणारा मानसिक त्रास पाहता दिपालीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना (दि.16 ) घडली.


आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल माहेरच्या  मंडळीला देखील याची माहिती दिपालीने दिली होती व माहेरी निघून गेली होती. चार दिवसा पूर्वीच प्राध्यापक पती हा दीपालीला तिच्या माहेरून घेऊन ठाणा गावात आला असून दोघांमध्ये पुन्हा भांडण होत असल्याचे दिपालीने आपल्या माहेरी सांगितले होते. मात्र घरच्या मंडळीने दीपालीला फोन वर धीर दिला. मात्र दीपाला राग अनावर झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात असून तिच्या कुटूंबियांनी हि आत्महत्या नसून हत्या हसल्याचा आरोप केला आहे.


या संदर्भात पोलिसांनी तपास चक्रे फिरविली असता मृत दिपालीच्या कुटूंबियां कडून नोंदविलेल्या बयाणातून पोलिसांनी प्राध्यापक पती आणि त्याची वहिनी यांना अटक केली असून पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत

Post a Comment

0 Comments