Breaking News

सांगोला तालुक्यातील अवैध स्टोन क्रशर तात्काळ बंद करा ; आर. आर .पाटील लोकविकास प्रतिष्ठानची मागणी

 सांगोला तालुक्यातील अवैध स्टोन क्रशर तात्काळ बंद करा ; आर. आर .पाटील लोकविकास प्रतिष्ठानची मागणी

सांगोला/प्रतिनिधी ; सांगोला तालुक्यात सुरू असणारे ७४ अवैध स्टोन क्रशर पंचनामे करून तात्काळ बंद करा, अशी मागणी आर. आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी केली आहे. अन्यथा २२ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे पत्र महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या मागणीमुळे सांगोला तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.


सांगोला तालुक्यात सर्व ७४ स्टोन क्रेशर हे पूर्णतः अवैध मार्गाने चालू आहेत. गेल्या तीन ते चार वर्षापासून त्यांच्याकडून भूसुरुंग स्फोट घडवीत ,दगडाचे उत्खनन वारेमाप सुरू आहे. जिल्हाधिकारी सोलापूर यांची कुठलीही परवानगी नसताना, हे क्रेशर सुरू आहेत. या स्टोन क्रेशरना कुठल्याही प्रकारचा खाणपरवाना देण्यात आला नाही. येथील महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे क्रेशर सुरू आहेत.


 अवैध मार्गाने चालणाऱ्या या स्टोन क्रेशरकडून महसूल विभागाचा मोठा महसूल बुडविला जात आहे. सहाजिकच महसूल प्रशासनास नुकसानकारक ठरणारे हे स्टोन क्रेशर तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी आर. आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. या क्रेशर धारकांनी केलेल्या अवैध उत्खननाचे पंचनामे करून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही या प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे .आपल्या मागणीची दखल न घेतल्यास पुणे येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर, येत्या २२ मार्च रोजी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा ,या प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी दिला आहे.


काही महिन्यांपूर्वीच पंढरपूर तालुक्यातील सर्व क्रेशर सील करण्यात आले आहेत. सांगोला तालुक्यातील ७४ स्टोन क्रेशरही तात्काळ सील करण्याची मागणी आर.आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. अवैध मार्गाने सुरू असणाऱ्या या क्रेशरचे पंचनामे करून ,त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा पुणे येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर येत्या २२ मार्च रोजी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments