Breaking News

शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकत शिरभावी येथील नवनाथ मोरे, सिताराम कोळेकर, मल्हारी मोरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

 शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकत शिरभावी येथील नवनाथ मोरे, सिताराम कोळेकर, मल्हारी मोरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

शिरभावी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील 


सांगोला : तालुका प्रतिनिधी निवडणुकीपुरते राजकारण असावे, निवडणुकीनंतर विकासकामांमध्ये राजकारण करू नये. निवडणुकी नंतर सदस्य व सरपंच कोणत्याही पक्षाचा नसतो तर जनतेचा प्रतिनिधी असतो. कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असला तरी विकास काम गावांमध्ये झाले पाहिजे हि भूमिका आमची आहे. परंतु येथील काही मंडळींनी गावामध्ये विकास कामांमध्ये राजकारण केले जात असल्याची भावना व्यक्त केली. यावर अशा चुकीच्या पद्धतीचे विकास कामांमध्ये राजकारण करू नये, आज गावच्या विकासाच्या चाव्या तुमच्याकडे असतील परंतू राज्याच्या विकासाच्या चाव्या आमच्याकडे आहेत. 


एवढे विकास कामावर राजकारण करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. असा विनंतीवजा सबुरीचा सल्ला देत, शिरभावी- देवकतेवाडी आणी शिरभावी- धायटी रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावू यासह शिरभावी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि आम. शहाजीबापू पाटील कटिबद्ध आहोत असे अश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिले. 


       शिरभावी ता. सांगोला येथील नवनाथ मोरे, सिताराम कोळेकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये काल रविवार दि. 6 मार्च रोजी जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते. 


या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे, जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले, वाटंबरे गावचे राष्ट्रवादीचे नेते विजयदादा पवार, वाढेगावचे सरपंच नंदकुमार दिघे, शिरभावीगावचे पांडुरंग नलवडे, शिरभावी गावचे माजी सरपंच अभिजित नलवडे, ज्येष्ठ नेते बाळदादा नलवडे, विलास नलवडे,नागनाथ घोरपडे, सिद्राम बोडरे, सत्यवान सरगर,


 ग्रामसेवक राजकुमार ताटे, अरुण फडतरे, अशोक शिनगारे, विष्णू घोरपडे, धनंजय घोरपडे, धनाजी साळुंखे, आदिनाथ जाधव आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला सन्मानाची वागणूक दिली जाते. पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणजे पक्षाची खरी ताकद असते. आज ती ताकद वाढवण्याचे काम येथील कार्यकर्त्यांनी व नेते मंडळींनी केले आहे.


 हीच ताकद गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी पणाला लावावी. दरम्यान येणाऱ्या प्रत्येकाला अडचणी सोडविण्यासाठी आम्ही खंबीरपणे प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्याची भूमिका बजावली जाईल. असा विश्‍वास देत, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून विकासकामांमध्ये राजकारण केले जाणार नाही. विकास कामाला चालना देण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे ही मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनीसांगितले. 


यावेळी नवनाथ मोरे म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. मा.आम. गणपतरावजी देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षांमध्ये निष्ठावंतांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने, मी शेकापला रामराम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यापुढील काळात मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व शिरभावी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतेमंडळींच्या सहकार्याने पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व पक्षाचे संघटन करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असा विश्वास देखील नवनाथ मोरे यांनी दिला. 


  यावेळी युक्रेन युद्धामध्ये अडकलेल्या विद्यार्थिनी सुखरूप पणे गावांमध्ये दाखल झाली. तसेच गावातीलच नागरिकांना समाजरत्न पुरस्कार मिळाला यासंदर्भात त्यांचा दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी शिरभावी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments