Breaking News

बारावीच्या परिक्षेला घाबरुन रोह्यात एका विद्यार्थ्याने शाळेजवळच्या जंगलात आत्महत्या

 बारावीच्या परिक्षेला घाबरुन रोह्यात एका विद्यार्थ्याने शाळेजवळच्या जंगलात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


 तो मूळचा नागोठणेजवळील पिंपळगाव येथे राहणारा होता.


4 मार्च रोजी बारावी बोर्डाचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता, याच परिक्षेच्या भितीने प्रवेश प्रकाश बांगारे या विद्यार्थ्याने शाळेच्याबाहेर जंगलात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. नागोठणेतील पिंपळगाव येथील राहणारा हा विद्यार्थी असून, तो 17 वर्षांचा होता. तर सानेगाव येथील आश्रमशाळेत शिकायला होता.


गेली दोन वर्षे लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन पद्धतीने मुले शिक्षण घेत होती. गावाकडील भागात इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे मुलांना या दोन वर्षात नीट शिक्षण मिळाले नाही आणि आता अचानक परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाल्यामुळे मुले तणावाखाली आली आहेत.


याच तणावाने प्रवेशचा बळी घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलीस निरक्षक संजय पाटील यांच्या मार्गदशनाखाली रोहा पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments