आता जे कामावर येणार नाहीत त्यांना नौकरीची गरज नाही असे समजून नवीन कर्मचारी भरती प्रक्रिया पूर्ण करणार !
“एसटीचे विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. विलिनीकरण या या मुद्द्यावर नेमलेल्या समितीने जो अहवाल दिला आहे त्यामधे विलीनीकरण शक्य नाही असे म्हटले आहे, म्हणून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आता लवकरात लवकर कामावर हजर व्हावे अन्यथा त्यांना नौकरीची गरज नाही असे समजून त्यांचा कायमस्वरूपी विचार सोडून त्यांच्या जागी नवीन कंत्राटी कर्मचारी यांची भरती प्रक्रिया राबवली जाईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.
या अहवामध्ये काही शिफारसी देखील करण्यात आल्या आहेत. कर्माचाऱ्यांना विलीनीकरणानंतर पगाराच्या बाबतीतले प्रश्न सुटतील असे वाटत होते. पण राज्य सरकारने संप सुरु असतानात कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ केली होती.
ज्यासाठी विलीनीकरणाचा हट्ट होता त्या मागण्या आम्ही अगोदरच मान्य केल्या होत्या. कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची आम्ही विनंती करत होतो. पण अजूनही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर आलेले नाहीत. मी कर्मचाऱ्यांना पुन्हा आवाहन करतो की त्यांनी कामावर यावे. कारवाई झालेल्यानंही कामवार यावे,” असेही अनिल परब म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या आहेत की, कुठल्याही कामगाराची रोजीरोटी जाणार आहेत याची काळजी घ्या. कोणालाही कामापासून वंचित ठेवू नका. म्हणून ज्यांना बडतर्फ केले आहे त्यांनीदेखील अपिल करावे. त्यांना कामावर परत घेण्याची प्रक्रिया राबवू.
यानंतरही काही कर्मचारी कामावर परतले नाहीत तर या कामगारांना नोकरीची गरज नाही असे समजू. त्यांच्याजागी कंत्राटीपद्धतीने सेवा राबवायची का याचा विचार करु. एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापुढेही कर्मचारी कामावर परतले नाहीत तर आम्हाला वेगळे पर्याय वापरावे लागतील आणि त्याची जबाबदारी एसटी कर्मचाऱ्यांची असेल,” असे अनिल परब यांनी सांगितले.

0 Comments