Breaking News

दिल्लीत डॉ. श्री. प्रविण निचत व श्रीमती अनुजा निचत ह्या पती पत्नीचा झाला सत्कार

 दिल्लीत डॉ. श्री. प्रविण निचत व श्रीमती अनुजा निचत  ह्या पती पत्नीचा झाला सत्कार    

प्रतिनिधी मुंबई बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार  तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट  डॉ. प्रविण निचत,  ह्यांना २०२२ चा एक्ससिल्लेन्स इन नॅचरोपॅथी अवॉर्ड २०२२ व त्यांच्या पत्नी श्रीमती अनुजा निचत  ह्यांना २०२२ चा नॅशनल वूमेन्स एक्ससिल्लेन्स अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे. हा सोहळा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सकपाळ व स्वर्गीय लता मंगेशकर ह्यांना श्रद्धांजली अर्पण करण्या हेतू घेण्यात आला. हा सत्कार सोहळा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कॉन्फरेन्स हॉल, जुने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे  संपन्न झाला. 


बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार  तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट डॉक्टर प्रवीण निचत व त्यांची पत्नी श्रीमती अनुजा निचत  ह्यांच्या कार्याची दाखल घेत  डॉक्टर विशाखा सोसिअल वेल्फेर फौंडेशनच्या वतीने २०२२ चा एक्ससिल्लेन्स इन नॅचरोपॅथी अवॉर्ड २०२२ व त्यांची पत्नी श्रीमती अनुजा निचत  ह्यांना २०२२ चा नॅशनल वूमेन्स एक्ससिल्लेन्स अवॉर्ड देऊन नवी दिल्ली येथे उपस्तिथ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमाला उदघाटक  म्हणून मा. श्री अमोलक्रतन कोहली माजी राज्यपाल (मिझोराम) प्रमुख पाहुणे म्हणून मा. रामदास आठवले जी लाभलेले.    तसेच विशेष अतिथी म्हणून सन्मानीय श्री प्रियांक कानुंगो (चेअरमन एन. सी. सी. आर. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया), डॉ. ज्ञानेश्वर मुले (मेंबर हुमान राईट्स कमिशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया) श्री झाकीर खान (चेअरमन डी. एम. सी. गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली) , डॉ मनीष गवई,व इतर  मान्यवर उपस्तिथ होते. 


त्यांच्या कार्याची वेगवेगळ्या संस्थांनी दखल घेऊन त्यांना जवळपास 165 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.  त्यांचे होप फाउंडेशन मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे. ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर "घरगुती उपाय" सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत. 


कोरोनाच्या काळात रोजंदारी वर काम करणाऱ्या गोर गरीब लोकांना आर्थिक मदत तसेच मोफत अन्न धान्य वितरित केले. श्रीमती अनुजा निचत ह्या एक समाजसेविका असून त्या त्यांचा नवऱ्याचा खांद्याला खांदा लावून त्यांची अहोरात्र मदद करत असते. ते होप फाऊंडेशन मार्फत त्यांचे समाजीक कार्य करीत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी महिला दिनानिमित्त २०२२ चा  नॅशनल वूमेन्स एक्ससिल्लेन्स अवॉर्ड जाहीर झाला आहे. हा सोहळा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सकपाळ ह्यांना श्रद्धांजली अर्पण करण्या हेतू घेण्यात येणार आहे.


त्यांची कामगिरी पाहता त्यांच्या ईस्ट मंडळी  कडून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या मित्र परिवार कडून त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीचा हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.

Post a Comment

0 Comments