देश सावरण्याची शक्ती नरेंद्राचे हाती.... सतीश भिडे.
जगात ज्यांनी भारताची बाजू समर्थपणे मांडली ते स्वामी विवेकानंद,.... धोक्याच्या क्षणी भारत मातेसाठी धावून येणारे नरेंद्र मोदी आणि आपल्या चतुरस्त्र वाणीने भक्तांना मार्गदर्शन करणारे नरेंद्र महाराज हा ऐतिहासिक ठेवा आहे असे उदगार स्वा. वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे ह्यांनी दादरा वापी येथें काढले.
नरेंद्र महाराज ह्यांचे भक्त परिवाराने शगुन सोसायटी येथें गीत वीर विनायक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवरायांच्या तसेच स्वा. वीर सावरकर ह्यांच्या मनातील हिंदवी स्वराज्य जगाच्या नकाशावर लवकरच अवतरेल असे सांगताच भक्त मंडळींनी शिवरायांच्या जयजयकार केला.
कार्यक्रमास जेष्ठ ढोलकी वादक शांताराम कोळी तसेच कु. आकांक्षा मुसळे, शैलेश रहाणे, मनोज सोनावणे ह्यांचा सहभाग लाभला होता.
महिला दिनाचे औचित्य साधून सादर केलेल्या कार्यक्रमास भगिनी मोठ्या संख्येनी हजर होत्या

0 Comments