बहुजन समाजाला शैक्षणिक प्रगतीच्या प्रवाहात आणण्याचे कार्य वामनराव शिंदे साहेबांनी केले :-.डॉ प्रभाकर माळी
सांगोला (प्रतिनिधी )आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझ्या बंधूंचे ज्येष्ठ सहकारी कै वामनराव शिंदे साहेब यांचे कार्य आदर्शवतच होते . "मरावे परी कीर्ती रुपी उरावे" या म्हणीप्रमाणे महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले यांचेच कार्य सांगोल्यात त्यांनी केले
असून माझ्या सामाजिक जीवनातील ते आदर्श व्यक्तिमत्त्व होते .सांगोला शहर व परिसरातील बहुजन समाजाला शैक्षणिक प्रगतीच्या प्रवाहात आणण्याचे खूप मोठे कार्य कै वामनराव शिंदे साहेब यांनी केल्याचे प्रतिपादन सांगोला अर्बन बँकेचे संस्थापक प्रमुख पाहुणे डॉ. प्रभाकर माळी यांनी केले.
यावेळी प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कै वामनराव शिंदे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन अनुक्रमे सौ सुवर्णाताई इंगवले मॅडम व डॉ प्रभाकर माळी ,संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, शिवांजली शिंदे यांनी पुष्पहार समर्पित करून अभिवादन केले. प्रमुख सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत संस्था सचिव निलकंठ शिंदे सर, विठ्ठलपंत शिंदे सर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले.
स्मृतिदिनानिमित्त प्रमुख मान्यवर मा. हरीराम बाबर सर ,विलास पाटील सर ,दत्तात्रय पाटील सर आदींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कै वामनराव शिंदे साहेब यांच्या कार्याची माहिती देऊन समयसुचित मनोगत व्यक्त करून अभिवादन केले.
संस्थापक कै वामनराव शिंदे साहेब यांच्या 29 व्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस पारितोषिक वितरण प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुंभार सर व सूत्रसंचालन सौ सुवर्णा इंगवले मॅडम तर आभार मुख्याध्यापिका अर्चना गोडसे मॅडम यांनी मानले. सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0 Comments