Breaking News

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेतून सांगोला तालुक्यातील ५८ किमीच्या रस्त्यांना १४ कोटी ५० लाख रुपये मंजूर : आमदार शहाजीबापू पाटील

 मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेतून सांगोला तालुक्यातील

५८ किमीच्या रस्त्यांना १४ कोटी ५० लाख रुपये मंजूर : आमदार शहाजीबापू पाटील 

सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजना विभागाकडून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेतून सांगोला तालुक्यातील ४४ गावातील एकूण ५८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली असून यासाठी १४ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती मुंबईहून बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.


सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे चालू असन अगामी अर्थसंकल्पात सांगोला विधान सभा मतदारसंघातील विविध विकास कामांना भरघोस निधी मिळविण्याचा प्रयत्न आमदार शहाजीबापू पाटील करीत आहेत. रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेत पाणंद रस्त्या करिता १४ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले असून पुढील महिन्यामध्ये नवीन ४० किलोमीटरच्या रस्त्यांना मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेतून मंजुरी देण्याचे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांना दिले आहे.


मनरेगा अंतर्गत वरील रस्त्यांची कामे केली जाणार असून लवकरच या कामांचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments