माननीय आयुक्त सो महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका दैनंदिन साफसफाई कामाच्या
ठेकेदारांचा मनमानी कारभार थांबविणे बाबत... असंघटित कष्टकरी कामगार महासंघ महाराष्ट्र निवेदन देण्यात आले
महोदय,उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आम्ही आपणास विनंतीपूर्वक निवेदन देत आहोत की ,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आठ प्रभागातील ठेकेदार यांच्याकडून सफाई कामगारांसोबत कोणतेही किरकोळ कारण दाखवून कामावरून कमी करण्याचा प्रकार दररोज सुरू झालेला आहे. सदर ठेकेदाराकडून नवीन काम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत व शिवम उद्योग यांचे काम चालू असून त्यांनी
दिनांक4/3/2022 रोजी दोन दिवस सफाई कामगार रूपाली सिद्धार्थ तालांडे या महिलेला काम करून देखील हजेरी लावण्यात आली नाही व तिला रजिस्टरवर सही करू दिली नाही सदर महिलेस उद्यापासून कामावर यायचे नाही ,असे सांगण्यात आले असून सदर महिलेला गेली दोन महिने पगार केला नसल्याचे घरामध्ये किराणा सामान नसल्यामुळे व पैसे मागण्यास गेले
असता तिला हाकलून देण्यात आले सदर महिला रडत रडत घरी गेली पैसे नाही व काम हे गेले यामुळे सदर महिलेचे मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे व घरात राशन पाणी नसल्यामुळे व कामावरून कमी केल्यामुळे तिने विषारी औषध प्राशन केले सदर महिलाही यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी येथे ऍडमिट असून तिच्यावर उपचार सुरू आहेत परंतु सुदैवाने तिचा जीव वाचला आहे अशा अशा पद्धतीने प्रभागातील ठेकेदार काही ना काही कारण दाखवून दररोज महिलांना कामावरून काढून टाकण्याचे षड्यंत्र चालू आहे.
तरी सदर ठेकेदारांवर आपण योग्य ती कारवाई करून सर्व कामगारांचा पगार व कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना कामावर घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी आम्ही आमच्या संघटनेच्यावतीने आपल्याकडे करत आहोत अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीने आपल्या दालनासमोर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी कळावे .
संदीपान झोबांडे प्रल्हाद कांबळे सविता खराडे

0 Comments