google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महावितरण कार्यालयात शेतकरी आत्मदहनाचा प्रयत्न !

Breaking News

महावितरण कार्यालयात शेतकरी आत्मदहनाचा प्रयत्न !

 महावितरण कार्यालयात शेतकरी आत्मदहनाचा प्रयत्न !

कोल्हापूर : संतापलेल्या शेतकऱ्याने महावितरण कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून काही काळ तणाव निर्माण झाला होता. 


महावितरण आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष आता अधिकच भडकू लागला असून ऐन उन्हाळ्यात वीज तोडणी मोहीम गतिमान झाल्याने शेतकरी अस्वस्थ आणि संतप्त झाले आहेत. महावितरण आणि शेतकरी यांच्यातील दरी वाढत चालली असून परिस्थिती वरचेवर स्फोटक बनत चालली आहे.  शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहेत, मुख्य जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आणि महावितरण नमायला तयार नाही त्यामुळे हा संघर्ष टोकाला जाण्याची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसू लागले आहेत. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना दिवसा दहा  तास वीज देण्यासाठी आक्रमक आहे तर दुसरीकडे थकीत वीज बिलासाठी महावितरण शेतकऱ्यांची  वीज तोडत आहे. 


गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांचा संताप विविध मार्गाने व्यक्त होत आहे परंतु आज कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयात चार गावातील संपत शेतकरी जमले होते. त्यातील एक शेतकरी निवास पाटील यांनी थेट महावितरण ( Mahavitaran ) कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला. निवास पाटील यांनी अचानकच अंगावर डीझेल ओतून घेतले आणि आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. एकाएकी घडलेल्या या प्रकाराने महावितरण कार्यालयात प्रचंड गोंधळ उडाला आणि तणावाची स्थिती निर्माण झाली. 


कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणने वीज पुरवठा तोडल्याने महे, बीड, कसबा, वाशी या चार गावातील संतप्त झालेले शेतकरी महावितरण कार्यालयात जमले होते. महावितरण अधिकाऱ्यांना अत्यंत आक्रमक होत ते जाब विचारात होते. चार गावातील शेतकरी संतापून बोलत असतानाच निवास पाटील या शेतकऱ्याने अंगावर डीझेल ओतून घेतले आणि आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित शेतकऱ्यांनी धाव घेत त्यांना या कृतीपासून रोखले. या घटनेनंतर तर शेतकऱ्यांच्या भावना अधिकच प्रक्षुब्ध झाल्या होत्या.


जोरदार खडाजंगी !

चार गावातील शेतकरी संतापुनच महावितरण कार्यालयात आले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडित केल्याबद्धल अधिकाऱ्यांना प्रश्न विचारीत होते. त्यातच एका शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न कार्यकारी अभियंता यांच्याच कक्षात केल्याने वातावरण संतप्त झाले आणि जोरदार खडाजंगी होताना दिसून आले.

Post a Comment

0 Comments