google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांनी केली या पदाधिकाऱ्याची पदावरून हाकलपट्टी

Breaking News

जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांनी केली या पदाधिकाऱ्याची पदावरून हाकलपट्टी

 जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांनी केली या पदाधिकाऱ्याची पदावरून हाकलपट्टी

सोलापूर : काँग्रेस पक्षाचे बार्शी शहर अध्यक्ष एडवोकेट जीवनदत्त आरगडे पाटील यांची जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा ठपका आरगडे पाटलांवर ठेवण्यात आला आहे. 

याप्रकरणी मुंबई मध्ये काही महिलांनी त्यांना जाऊन चांगलाच चोप दिला होता त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचं पाहायला मिळालं. या विषयाची गंभीर दखल घेत काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीने जीवनदत्त आरगडे पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांना केल्या त्यानुसार त्यांनी पत्र काढले आहे. 

या पत्रात ०८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिना दिवशी महिलांचा अपमान होईल असे केलेले कृत्य सोशल मिडीया व वृत्तपत्रातून प्रकाशित झाले व आपल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे काँगेस पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून जिल्हा कॉंग्रेस शिस्तपालन समितीच्या शिफारशी नुसार आपल्याला पदावरुन काढण्यात आले आहे. धवलसिंह मोहिते पाटलांनी केली या पदाधिकाऱ्याची पदावरून हाकलपट्टी

सोलापूर : काँग्रेस पक्षाचे बार्शी शहर अध्यक्ष एडवोकेट जीवनदत्त आरगडे पाटील यांची जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा ठपका आरगडे पाटलांवर ठेवण्यात आला आहे. 

याप्रकरणी मुंबई मध्ये काही महिलांनी त्यांना जाऊन चांगलाच चोप दिला होता त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचं पाहायला मिळालं. या विषयाची गंभीर दखल घेत काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीने जीवनदत्त आरगडे पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांना केल्या त्यानुसार त्यांनी पत्र काढले आहे. 

या पत्रात ०८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिना दिवशी महिलांचा अपमान होईल असे केलेले कृत्य सोशल मिडीया व वृत्तपत्रातून प्रकाशित झाले व आपल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे काँगेस पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून जिल्हा कॉंग्रेस शिस्तपालन समितीच्या शिफारशी नुसार आपल्याला पदावरुन काढण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments