" नाना पटोलेंना उर्जामंत्री करा , तेच . " ; '
; सोलापुरातील काँग्रेस नेत्यांची मागणी
सोलापूर: जिल्ह्यात काल (१३ मार्च) काँग्रेस विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस नेत्यांनी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कारभारावर नाराजी जाहीर करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उर्जामंत्री करा अशी मागणी केली आहे.काँग्रेस नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनी ही इच्छा व्यक्त करून दाखवली आहे.
नाना पटोले जर उर्जामंत्री झाले तर शेतकऱ्यांचे वीज कट लांब शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाल्याशिवाय राहणार नाही. असेही धवलसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले आहे. सोबतच आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद द्या, अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या खात्यावर नाराजी असतात ही मागणी वेगळ्याच चर्चांना उधान देऊन गेली आहे. तसेच यावेळी राष्ट्रवादी अडचणीत आणत असल्याचा आरोपही सोलापूर काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना ही मागणी काँग्रेस- राष्ट्रवादीत फुट पडत आहे काय? या चर्चांना उधान देत आहे.

0 Comments