google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा; अखेर राज्यपालांनी केली विधेयकावर स्वाक्षरी

Breaking News

ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा; अखेर राज्यपालांनी केली विधेयकावर स्वाक्षरी

 ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा; अखेर राज्यपालांनी केली विधेयकावर स्वाक्षरी 

मुंबई :- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेर राज्य सरकारच्या ओबीसी विधेयकावर स्वाक्षरी केली. राज्य सरकारने विधिमंडळात ओबीसी आरक्षणासंदर्भात विधेयक मंजूर केले होते. या विधेयकावर आता भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी सही केली आहे. त्यामुळे आता राज्यातील निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या गेल्या आहेत. दरम्यान, विशेषतः ओबीसींचे राजकीय आरक्षण सोडवण्यासाठी राज्य सरकारने नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मंजूर केले होते. त्यानुसार विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी गरजेची होती.


महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे शिष्टमंडळ आज राजभवनावर पोहचले. त्यानंतर शिष्टमंडळाने राज्यपालांना स्वाक्षरीची विनंती केली आणि अखेर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधेयकावर स्वाक्षरी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त निवडणूक घेण्याचे अधिकार असणार आहेत. निवडणूक वगळता सर्व अधिकार राज्य सरकारकडे येतील. यामुळे आता प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे देईपर्यंत निवडणूक जाहीर करता येणार नाही. स्वाक्षरी झाल्यानंतर विधेयक कायद्यात रूपांतरित होईल. त्यामुळे आता या विधेयकामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकून राहण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments