खळबळ! बारावीचा 'या' विषयाचा पेपर फुटला; कोचिंग क्लासचा शिक्षक ताब्यात
गेल्या शनिवारी झालेल्या १२वीच्या रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालाडमधील खासगी क्लासेसमार्फत ही घटना झाल्याचं समोर आलंय. मुकेश यादव असं या खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. कोचिंग क्लासमधील तीन विद्यार्थ्यांना हा पेपर आधीच मिळाला होता. त्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना हा प्रकार समोर आल्याने पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शनिवारी सकाळई १०.३० वाजता सुरू होणार असलेला पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झाला. विले पार्ले पोलिसांनी याप्रकरणी यादव नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय. विले पार्लेतील साठे महाविद्यालयात एक विद्यार्थीनी उशीराने आल्याने तिच्या चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय

0 Comments