संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करावेत ; तहसीलदार अभिजात पाटील यांचे आवाहन
सांगोला/तालुका प्रतिनिधी ;- सांगोला तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना , अपंग योजना , श्रावण बाळ योजना इत्यादी योजनेतील लाभार्थी यांनी १५ एप्रिल २०२२ पर्यंत हयातीचे दाखले आपापल्या गावातील गावकामगार तलाठी यांचेकडे जमा करावेत. जे लाभार्थी आपल्या हयातीचे दाखले तलाठी यांच्याकडे जमा करणार नाहीत अशा लाभार्थ्यांची पेन्शन ( अनुदान ) बंद होणार आहे.
हयातीचे दाखले जमा करण्याची सर्वस्वी जबाबदारी पेन्शनधारकांची असून जे लाभार्थी हयातीचे दाखले नाहीत त्यांना शासनाच्या मिळणाऱ्या अनुदाना पासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे हयातीचे दाखले लवकरात लवकर आपल्या गावचे तलाठी यांच्या कडे जमा करावेत.असे आवाहन तहसीलदार अभिजात पाटील यांनी केले आहे.
👉संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागणारी कागदपत्रे ;-
१. विहित नमुन्यातील हयातीचा अर्ज.
२.रेशनकार्ड झेरॉक्स.
३. स्वतःचे,मुलांचे आधार कार्ड झेरॉक्स.
४. बँक पासबुक झेरॉक्स
५.पतीचा मृत्यूचा दाखला किंवा कोर्टाचे सोडपत्र (सोडचिठ्ठी) .
६.स्वतः चा १ फोटो.
👉श्रावणबाळ , वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागणारी कागदपत्रे ;-
१. विहित नमुन्यातील हयातीचा अर्ज.
२.रेशनकार्ड झेरॉक्स.
३. स्वतःचे,मुलांचे आधार कार्ड झेरॉक्स.
४. बँक पासबुक झेरॉक्स
५.स्वतः चा १ फोटो.
👉अपंग योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागणारी कागदपत्रे ;-
१. विहित नमुन्यातील हयातीचा अर्ज.
२.रेशनकार्ड झेरॉक्स.
३. स्वतःचे,मुलांचे आधार कार्ड झेरॉक्स.
४. बँक पासबुक झेरॉक्स
५. अपंग असल्याबाबतचे प्रमाणपत्र
६.स्वतः चा १ फोटो.
0 Comments