Breaking News

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना

 उघडकीस आली आहे खळबळनामा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. काही असामाजिक तत्त्वांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर तोडले आहेत. तसेच घराच्या गेटवरील बूम बॅरिअरही तोडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर भाजपच्या गुंडांनीच हा हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे. सिसोदिया यांनीही या हल्ल्याला भाजप जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, आपच्या या आरोपावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप (BJP) यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून या हल्ल्याचं संपूर्ण खापर भाजपवर फोडलं आहे. भाजपच्या गुंडांनी केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली आहे. भाजपच्या पोलिसांनी या गुंडांना रोखण्याऐवजी केजरीवालांच्या घरापर्यंत त्यांना घेऊन गेली, असा आरोपही सिसोदिया यांनी केला आहे.


50 कार्यकर्त्यांना अटकभाजप युवा मोर्चाची निदर्शने सुरू होती. त्यावेळी आंदोलकांनी गोंधळ घातला. सीसीटीव्हीवरही हल्ला केला. मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर रंग फेकला. या प्रकरणी आम्ही 50 लोकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर जमलेला जमाव पांगवण्यात आला असून आता या परिसरात शांतता असल्याचं दिल्ली नॉर्थ डीसीपींनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments