google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग : मास्कबाबत ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, राज्यातील सर्व कोविड निर्बंध हटवले..!

Breaking News

ब्रेकिंग : मास्कबाबत ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, राज्यातील सर्व कोविड निर्बंध हटवले..!

 ब्रेकिंग : मास्कबाबत ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, राज्यातील सर्व कोविड निर्बंध हटवले..!

महाराष्ट्रातील नागरिक ज्या बातमीची गेल्या दोन वर्षांपासून वाट पाहत होते, अखेर ती बातमी आली.. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यातील सारे कोविड निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतलाय.. त्यामुळे यंदा राज्यात गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


ठाकरे सरकारने  गुढीपाडवा साजरा करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलंय. मंत्रीमंडळाच्या आज (ता. 31) झालेल्या बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने हटवण्यात आले. त्यामुळे दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच गुढी पाडव्याची मिरवणूक काढता येणार आहे. शिवाय डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व मुस्लिम बांधवांना रमजानही उत्साहात साजरा करता येणार आहे..


आता मास्कही ऐच्छिक..

विशेष म्हणजे, आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी नागरिकांची मास्कपासून सुटका होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज राज्यातील नागरिकांची मास्कमधूनही सुटका केल्याचे सांगितले..


मंत्री आव्हाड म्हणाले, की “ज्यांना मास्क लावावा असे वाटत असेल, त्यांनी तो लावावा, ज्यांना वाटत नसेल, त्यांनी मास्क नाही लावला तरी चालेल.. आता राज्यात कोणतंही बंधन राहिलेलं नाही.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रीमंडळाने गुढी पाडव्यापासून अर्थात 2 एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे..”


राज्य सरकारने 1 ते 8 एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे गुढीपाडवा, रामनवमी हे सण कसे साजरे करायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात होती. मात्र, सरकारने आज सगळे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतल्याने हे सण धूमधडाक्यात साजरे होणार, हे नक्की..!


दरम्यान, मास्कचा निर्णय ऐच्छिक करण्यात आला असला, तरी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी मास्कचा वापर करावा, तसेच सुरक्षित अंतर ठेवणे व कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून स्वत:ची, तसेच इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments