google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

Breaking News

सोलापूर : गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

 सोलापूर : गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

सोलापूर: शहरातील विविध भागांत मटका, जुगार, घरगुती गॅस ऑटोरिक्षात इंधन म्हणून वापरणे, हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. पोलिस आयुक्‍तांच्या विशेष पथकाने अवैध व्यावसायिकांवर अनेकदा कारवाया केल्या आहेत.त्यासंदर्भात ''सकाळ''ने २० मार्च रोजी अवैध धंदे वाढू लागल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची गंभीर दखल घेऊन पोलिस आयुक्‍तांनी संबंधित गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


शहरात अवैध धंदे पुन्हा वाढत असल्याबद्दल अनेकांनी पोलिस आयुक्‍त श्री. बैजल यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्या अवैध धंद्यांचा शहरातील अनेकांना त्रास होऊ लागला आहे. दरम्यान, अवैध धंद्यांना कोणत्याही प्रकारे कोणीही पाठीशी न घालता त्यांच्यावर थेट प्रतिबंधक कारवाई करावी, असे आदेश पोलिस आयुक्‍तांनी दिले आहेत. दरम्यान, नागरिकांकडून प्राप्त तक्रारीनुसार गुन्हे शाखेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी कारवाई करून २४० गुन्हे दाखल केले आहेत. तर मटका व जुगारासंदर्भात ७२ गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगार, शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांसह अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध एमपीडीए व तडिपारीची कारवाई केली जात आहे. यापुढेही अशाच कारवाया केल्या जातील,


असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments