अल्पवयीन मुलीवर तिघांनी केला लैंगिक अत्याचार;
मुलीने दिला बाळाला जन्म, पिता कोण यासाठी चार जणांची होणार डीएनए तपासणी
रस्त्याच्या मधोमध जन्मलेल्या बाळाला सोडलेल्या कुटुंबाचा पोलिसांनी लावला शोध
पंढरपूर :- १ तासापूर्वी जन्मलेल्या नवजात पुरुष जातीचे बाळाला रस्त्याच्या मधोमध मरण्यासाठी अज्ञात लोकांनी सोडले होते. मात्र ज्याला देव तारी, त्याला कोणी मारी या म्हणीप्रमाणे रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवाशांनी त्या बाळाला रुग्णालयात दाखल करुन त्याचा प्राण वाचवला होता. या प्रकरणात पोलीसांनी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल करुन, चारजणांनी अटक केली असून त्यांचा न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहती पोनि. मिलींद पाटील यांनी दिली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील स अविनाश नागनाथ वसेकर (वय ३२) हे त्यांचे कुंटूबासह शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मायाक्का चिंचणी देव दर्शना करीता त्यांची चारचाकी गाडीने जात होते. या दरम्यान ते नारायण चिंचोली गावचे पाण्याच्या टाकीच्या समोर साईराज ढाब्याजवळ आले. त्यांना रस्त्याच्या मध्यभागी एक नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक अंदाजे १ ते २ तासापुर्वीचे जन्मलेले असल्याचे दिसुन आले. त्या बाळास उपचारासाठी डॉ. शितलशाह हस्पीटल पंढरपुर येथे आणुन दाखल केले होते. त्याबाळावर त्या रुग्णालयात १७ दिवस मोफत उपचार करण्यात आले. त्यानंतर बाळाला नवरंगे बालकाश्रमात देखभालीसाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविराधोत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर सहाय्यक पोलीस फौजदार अशोक जाधव, पोकॉ नितीन माळी यांनी तपासाची चक्रे फिरवली, यानंतर तालुक्यातील एका गावात एकामुलीला त्रास होत असल्याने प्रसृतीकरण्यासाठी एका रिक्षामध्ये घेऊन गेल्याची माहीती पोलीसांच्या हाती लागली. पोलीसांनी यामाहतीच्या अधारे सर्व चौकशी केली, यावेळी याच रिक्षातून प्रसृतीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला पुरुष जातीचे मुले झाले असून तेच मुल रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आले असल्याची खात्रीलायक माहीती समोर आली. या प्रकरणी अल्पवयीन मुलगी, रिक्षाचालक, मुलीचा भाऊ, आई, वडील यांच्या विरोधात लहान मुलाला आई-वडील किंवा देखबाल करणाऱ्या व्यक्तींनी उघड्यावर टाकणं किंवा त्याचा परित्याग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील पाचजणांना न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.
पिता कोण हे ओळखणे झाले कठीण
या प्रकरणात संबंधित लोकांना अटक केल्यानंतर त्या लहान बाळाची आई अल्पवयीन असल्याचे उघड झाले. मात्र त्या अल्पवयीन मुली बरोबर तिघांनी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यामुळे त्या मुलाचा पिता कोण हे ठरवणे मुश्किल झाले आहे. तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण उर्फ भैय्या शशिकांत दावणे व दत्ता परमेश्वर खरे या दोन तरुणांना अटक केली असून आणखीन एका च्या शोधात पोलीस आहेत.
:::: चौघांच्या डी एन ए ची तपासणी ::::
त्या लहान मुलाचा, मुलाला जन्म देणाऱ्या मातेचा, व त्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांचा असे मिळून चार जणांचे डी एन ए तपासण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली.
0 Comments