google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : सोलापूर जिल्हा सायकल प्रेमी यांच्यावतीने पंढरपूर- कन्याकुमारी पर्यावरण बचाव रॅलीचे आयोजन

Breaking News

सोलापूर : सोलापूर जिल्हा सायकल प्रेमी यांच्यावतीने पंढरपूर- कन्याकुमारी पर्यावरण बचाव रॅलीचे आयोजन

 सोलापूर : सोलापूर जिल्हा सायकल प्रेमी यांच्यावतीने पंढरपूर- कन्याकुमारी पर्यावरण बचाव रॅलीचे आयोजन

सायकल रॅलीचा  सर्वत्र निसर्ग संवर्धन ,पर्यावरण बचाव ,बेटी बचाव -बेटी पढाव हा मुख्य हेतू :-निळकंठ शिंदे सर 


सोलापूर जिल्ह्यातील सर्व सायकलप्रेमी सदस्यांना कळविण्यात आनंद होतो की पंढरपूर येथे झालेल्या नियोजित   तनपुरे महाराज येथे  झालेल्या मीटिंग प्रमाणे "पंढरपूर ते कन्याकुमारी" ही राईड निश्चित करण्यात आली आहे. सदर  सायकल राईड भारतातील सर्वात मोठी सायकल राइड असणार आहे एकूण सर्वसाधारण दोन हजार किलोमीटर सायकलिंग 13 ते 14 दिवसात पूर्ण करणार आहेत .


'श्रीरामनवमी ',दिनांक 10 एप्रिल 2022  निश्चित करण्यात आली आहे.     "पंढरपूर - सांगोला - मंगळवेढा - विजापूर -  अलमट्टी- हम्पी- होस्पेट- कित्तुर - धारवाड - हुब्बळी - हावेरी - रणीबे न्नुर - हरिहर - दवणंगेरी - चित्रदुर्ग - हिरयुर - सारी - कन गलादू - तुमकुरू - दोडबल्लापूर - बेंगळुरू  - रामनगर - मांड्या - श्रीरंग पट्टण - म्हैसूर - चामराजनगर - बांदिपुर 


 सत्यमंगलंम - भवानी सागर मेट्टा पलयम - कोईम्बतूर - पोल्लची - पलानी - दिंदिगल - मदुराई - विरुदु नगर - सत्तुर - कोविल्पती - तिरुनेलवेली - नगुनेरी - कन्याकुमारी या मार्गे सायकल रॅली  निघून महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू राज्यात सर्वत्र निसर्ग संवर्धन ,पर्यावरण बचाव ,बेटी बचाव -बेटी पढाव हा संदेश घेऊन प्रस्थान ठेवणार आहे . त्याचबरोबर  संपूर्ण दक्षिण भारतातील या मार्गातील ऐतिहासिक स्थळे पर्यटन याठिकाणी भेट देणार आहे. रॅलीचा शेवट स्वामी विवेकानंद यांना कन्याकुमारी येथे अभिवादन करून होणार आहे


 तरी सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक सदस्यांनी 25 मार्च 2022 पर्यंत प्रवेशशुल्क भरून नाव नोंदणी निश्चिती करावी, प्रवेशशुल्क रुपये -1000 .एकूण शुल्क रुपये- 5000 यामध्ये दोन वेळचे शाकाहारी जेवण ,वाहन खर्च( बॅकअप वाहन) समाविष्ट आहे .अधिक माहितीसाठी टीम समन्वयक  निळकंठ शिंदे सर


 (सांगोला)8983541515, प्रमोद जवंजाळ, कुर्डूवाडी(7420928812) ,सचिन बंडगर सर  9096521074(माढा ),उमेश राऊत (इंदापूर )यांच्याशी संपर्क साधावा. इतर सर्व माहिती व सूचना वेळोवेळी देण्यात येतील .नोंदणी शुल्क या फोन पे द्वारा No-9403452950 पाठवावेत . असे आव्हान या संयोजक समितीच्या वतीने नीलकंठ शिंदे सर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments