एसटीला भीषण आग ; माण तालुक्यातील घटना ; जिवीतहानी नाही
सातारा - पंढरपुर रस्त्यावरील माण तालुक्यातील धुळदेव येथे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता बर्निंग एसटीचा थरार पहायला मिळाला.एसटी चालकाच्या प्रसंगावधामुळे ४४ प्रवाशांचे प्राण वाचले व कोणतीही जीवितहानी नाही.
मात्र एसटी बस जळून खाक होऊन फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता.सातारा आगाराची एमएच - ११- बीएल- ९ ३५५ हि एसटी सोलापूरला जात असताना म्हसवडपासून पूर्वेस सुमारे सात किलोमीटर अंतरावरील धुळदेव या गावाच्या बस थांब्याजवळ एसटीच्या इंजिन मधून धूर येत असल्याचे चालक शंकर पवार यांच्या लक्षात आलेवर त्यांनी प्रसंगावधान राखून बसमध्ये बसलेल्या ४४ प्रवाशांना वाहक सुधीर जाधव यांना तात्काळ खाली उतरवण्यास सांगितले.
त्यानंतर एसटी वाहक जाधव यांनी सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवल्यानंतर पाच ते दहा मिनिटातच आगीने रुद्र रूप धारण केल्याने बसने पेट घेतला . या घटननेची माहिती म्हसवड पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचा बंब बोलावून घेऊन एसटी विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतू संपूर्ण एसटी बस जळून खाक झाली होती व फक्त सांगाडाच शिल्लक राहिला होता . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती .
0 Comments