महिम येथे शेतकऱ्याचे धन वाचवायला डॉ . बाबासाहेब देशमुख धावले
महीम / वार्ताहर : वेळ दुपारची होती . लगीन घटिका जवळ आली होती . पै पाहुणे , मित्र परिवारानी माहोल गजबजला होता . अशातच फटाके लावले अन् त्याची ठिणगी उसाच्या चिपाडात गेली .. क्षणात आगीने पेट घेतला आणि ऊस जळू लागला .. ही
घटना पाहताच स्व , भाई गणपतराव देशमुख यांचे नातू शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शेतकऱ्याचे धन वाचवण्यासाठी समवेत धावले
शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर त्या आगीवर नियंत्रण मिळवताच डॉ . बाबासाहेब सर्व युवक देशमुख यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे . याबाबत अधिक माहिती अशी महिम ता सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते बंडगर यांच्या मुलाचे विवाह सोहळ्यास डॉ बाबासाहेब देशमुख उपस्थित होते फटाक्याची आतषबाजी करण्यात आली
शेतकरी बाळासाहेब पवार यांच्या पाटील वस्ती येथील मळ्यामध्ये उसाच्या फडाला आग लागली कोणत्याही क्षणाचा विलंब न करता डॉ देशमुख उपस्थित तरुणा समवेत बरोबरीने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले व उसाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले डॉ बाबासाहेब देशमुख यांचे संपूर्ण तालुका भर दौरे सुरु आहेत
विविध कार्यक्रमांना उद्घाटनाना लग्न समारंभांना भेटी देत आहे त्यांनी गेल्या पाच दिवसात ६० गावांना भेटी दिल्या आहेत जनतेतून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे त्यांच्यासमवेत चेअरमन अंकुश येडगे एडवोकेट धनंजय मिटकरी , महिम चे माजी सरपंच वसंतराव रुपनर , शंकर चौगुले , आप्पा नारनवर युवा नेते रणजित रुपनर यांच्यासह आदी उपस्थित होते .


0 Comments