google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महमदाबाद (हुन्नुर)ता.मंगळवेढा येथील कंटेनर चालकाचा सांगोल्यातील उदनवाडी जवळ खून

Breaking News

महमदाबाद (हुन्नुर)ता.मंगळवेढा येथील कंटेनर चालकाचा सांगोल्यातील उदनवाडी जवळ खून

 महमदाबाद (हुन्नुर)ता.मंगळवेढा  येथील कंटेनर चालकाचा सांगोल्यातील उदनवाडी जवळ खून



सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) ; पाच ते सहा अनोळखी इसमानी अज्ञात कारणाने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कंटेनर चालकाचे अपहरण करून त्याच्या डोक्यात मारहाण करून खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने त्याचे प्रेत मोटार सायकलसह उदनवाडी ते चोपडी जाणाऱ्या रोडच्या कडेला दगडामध्ये टाकून दिल्याची घटना घडली आहे . 


संजय भगवान चव्हाण रा . महमदाबाद ( हुन्नूर ) ता. मंगळवेढा असे खून झालेल्या कंटेनर चालक युवकाचे नाव आहे.


 सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील , पोलीस निरीक्षक सुहास जगताप ,सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली . पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला . याबाबत अधिक माहिती अशी , महमदाबाद  (हुन्नूर )ता . मंगळवेढा येथील भगवान बाबू चव्हाण यांचा मुलगा संजय हा सोनंद येथील सुनिल शेठ यांच्या कंटेनरवर ड्रायव्हर आहे . संजयची पत्नी २०१७ मध्ये मयत झाली आहे . ३१ जानेवारी रोजी भगवान चव्हाण यांनी संजय याच्या मुलांची घेरडी येथे वडिलांसोबत भेट घडवून आणली होती . ७ फेब्रुवारी रोजी भगवान चव्हाण यांनी संजय यास फोन केला असता फोन सुरेश माने यांनी उचलला . 


त्यास संजय कुठे आहे असे विचारल्यावर त्याने ६ फेब्रुवारी रोजी नेज , ता . हातकणंगले , जि . कोल्हापूर येथून संजय यास अज्ञात कारणावरून अनोळखी पाच ते सहा जणांनी मिळून मारहाण करून मोटर सायकलवर बसवून घेवून गेले आहेत असे सांगितले . 


त्यानंतर ११ च्या वाजण्याच्या सुमारास पोलीस पाटील राजू कटरे यांनी भगवान चव्हाण यांना फोन करुन संजय याचा सांगोला पोलीस ठाणे हद्दीमध्ये उदनवाडी ते चोपडी जाणाऱ्या रोडच्या कडेला असलेल्या दगडांमध्ये अपघात झाल्याचे सांगितले . त्यावरून भगवान चव्हाण हे उदनवाडी येथे आले असता त्यांना , संजय हा दगडामध्ये मयत अवस्थेत पडलेला दिसला . त्याच्या डोकीत जखमा झालेल्या होत्या , तसेच चेहरा रक्ताने माखलेला होता . 


त्याच्या जवळच त्याची मोटारसायकल एम . एच .१३ डी.एल ६६०४ पडलेली होती . सदरचा मृतदेह मुलगा संजय याचाच असल्याचे वडिलांनी ओळखले . दरम्यान झापाचीवाडीचे पोलीस पाटील मंगेश जवंजाळ यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली . मुलगा संजय यास अनोळखी पाच ते सहा इसमांनी कोणत्यातरी कारणावरून नेज , ता . हातकणंगले येथे मारहाण करून अपहरण करून , त्याच्या डोक्यात कशानेतरी मारहाण करून त्याचा खून केल्याची भगवान चव्हाण यांची खात्री झाली . 


याप्रकरणी मयत तरुणाचे वडिल भगवान चव्हाण यांनी अनोळखी पाच ते सहा इसमांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंतकुमार काटकर करीत आहेत .

Post a Comment

0 Comments