नगरपरिषदेमार्फत उत्कर्ष शाळेत वसुंधरा प्रश्नमंजुषा संपन्न ; मुख्याधिकारी कैलास केंद्रे
सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) :पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जल,पृथ्वी , आकाश , अग्नी , वायू या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा २.० या अभियाना अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी सांगोला नगरपरिषदे मार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत .
सांगोला शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धना बाबत जनजागृती व्हावी यासाठी नगरपरिषदेमार्फत उत्कर्ष शाळेत वसुंधरा प्रश्न मंजुषा स्पर्धा घेतल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली .
लहान मुलं , मुली हे उद्याच्या नवीन पिढीचे शिलेदार व देशाचं भविष्य आहेत ही बाब ओळखून त्यांना वृक्षारोपणाचे महत्व , वसुंधरेचे जतन , हवा पर्यावरणीय हास , प्रदूषण , जलसंधारण या गोष्टींबाबत माहिती मिळावी व त्याच्यात जबाबदारीची भावना निर्माण व्हावी या उद्देशातुन सांगोला नगरपरिषदेमार्फत उत्कर्ष शाळेत पर्यावरणावर आधारित १५ प्रश्नांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेतली .
सदर परीक्षेतइयत्ता ५ वी ते ९ वी च्या सुमारे विद्यार्थ्यांनी ३५० सहभाग नोंदविला . या वसुंधरा प्रश्नमंजुषा स्पर्धेस मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या समवेत कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर , करनिरीक्षक तृप्ती रसाळ , नोडल अधिकारी स्वप्निल हाके ,पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने , लेखापाल विजय कन्हेरे , निरीक्षक स्वच्छता विनोद सर्वगोड , शहर समन्वयक शिवाजी सांगळे , सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

0 Comments