सावधान...! मेडिकल दुकानात जर तुम्ही शीतपेये, कुरकुरे, चिप्स विक्री करीत असाल तर तुमचा परवानाही रद्द होऊ शकतो ; अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील
लोणी काळभोर : मेडिकलमध्ये यापुढे औषधे विक्रीसाठीच परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा मेडिकलमधून फक्त औषध विक्रीच करण्याच्या सूचना सर्व औषध दुकानदारांना देण्यात आलेल्या आहेत. सदर सुचनांचे परवानाधारकाने पालन न केल्यास कायद्यांतर्गत कारवाई करून दुकानाचा परवाना काढून घेण्यात येईल असा कडक इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्यासह पूर्व हवेलीत अनेक ठिकाणी मेडिकल दुकाने आहेत. बहुतांश मेडिकलमध्ये सर्हासपणे औषधाबरोबरच आईस्क्रीम, कुरकुरे, कोल्ड्रिंक्स, चिप्ससह आदी पदार्थ विकले जातात. त्यामुळे हि मेडिकल दुकाने आहेत का किराणा मालाची दुकाने असा प्रश्न नागरिकांना पडला होता. जिल्ह्यातील काही मेडीकल दुकाने हि अत्यावश्यक सेवेसह रात्री ११ वाजेपर्यंत सुरु असतात तर काही मेडिकल हि २४ तास सुरु असतात.
मेडिकलमधून मेडिकल व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी नियमांचे काटेकोर पालन होत नाही. अनेक औषधांच्या दुकानांवर आईसक्रीम, चॉकलेट्स, शीतपेय, आईस्क्रीम आणि चिप्स विकू लागले आहेत. मेडिकल चालकाने उपस्थित राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केलेल्या यादीप्रमाणे गोळ्या व औषधे देणे बंधनकारक आहे. मात्र मेडिकल चालक दुसऱ्याच गोष्टीना प्राधान्य देत आहेत. अशा मेडिकलवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी मेडिकल चालकांनी गोळ्या औषधाव्यतिरिक्त अन्न पदार्थ विक्री करताना आढळल्यास किंवा दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास कायद्यांतर्गत कारवाई करून मेडिकल दुकानाचा परवाना काढून घेण्याचे परिपत्रक जरी करण्यात आले आहे.

0 Comments