मंगळवेढा तालुक्यातील वाळू ठेक्याचे पुन्हा फेर लिलाव होणार? शासनाच्या नवीन धोरणामुळे पेच निर्माण
राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार वाळू लिलाव रक्कम स्वीकारा, अन्यथा जानेवारीत झालेला वाळू लिलाव रद्द करून पुन्हा फेर लिलाव घ्या, अशी मागणी वाळू ठेकेदारांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना विचारले असता, त्यांनी याबाबत राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवणार असल्याची माहिती दिली आहे.
राज्य शासनाच्या जुन्या धोरणानुसार वाळू लिलावाचा अपसेट प्राइस ४३७३ इतका होता. या अपसेट प्राइसनुसार जानेवारीत झालेल्या बाळू लिलावात ठेकेदारांनी भाग घेतला. ४ बाळू घाटांचे लिलाव फायनल झाले.
याचदरम्यान राज्य शासनाने नवीन धोरण जाहीर केले. नवीन धोरणानुसार अपसेट प्राइस फक्त ६५० इतका करण्यात आला आहे. ही रक्कम अत्यंत अल्प आहे.
जुन्या प्राइसनुसार अर्धनारी बठाण येथील घाट १ चा ठेका राजमुद्रा लाइफस्टाईल कंपनीने एकूण २१ कोटी ३३ लाखाला घेतला आहे. कंपनीने एकूण बोलीच्या २५ टक्के रक्कम दि.१७ जानेवारीला जिल्हा प्रशासनाकडे जमा केली आहे.
उर्वरित ७५ टक्के रक्कम भरणे कंपनीसाठी अडचणीचे ठरत आहे. जुन्या आणि नवीन अपसेट प्राइसमध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे नवीन धोरणानुसार अपसेट प्राइस निश्चित करून लिलाव रक्कम स्वीकारा.
जुन्या अपसेट प्राइसनुसार रक्कम भरल्यास कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. त्यामुळे फेरलिलाव करा, अशी मागणी राजमुद्रा लाइफस्टाईलने केली आहे.
अर्धनारी-बठाण, घोडेश्वर, तामदर्डी, मिरी तांडोर, मिरी-सिध्दापूर या ठिकाणचे वाळू लिलाव देखील प्रलंबित आहेत लिलाव प्रक्रियेत सहभागी असलेल्या मक्तेदारांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन
शासनाच्या नवीन धोरणानुसार म्हणजे ६५० प्रतिब्रास दराने पैसे भरून घ्या, अन्यथा शासनाच्या नवीन धोरणानुसार सर्वच वाळू ठेक्याचे जाहीर लिलाव करण्याची मागणी केली आहे.
0 Comments