google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ.नितीन बाबर यांच्या अर्थप्रवाह पुस्तकाचे आरोग्य राज्यमंत्री मा.ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार प्रकाशन

Breaking News

डॉ.नितीन बाबर यांच्या अर्थप्रवाह पुस्तकाचे आरोग्य राज्यमंत्री मा.ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार प्रकाशन

 डॉ.नितीन बाबर यांच्या अर्थप्रवाह पुस्तकाचे आरोग्य राज्यमंत्री मा.ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार प्रकाशन  


सांगोला (प्रतिनिधी): राज्यांचे आरोग्य राज्यमंत्री  मा. ना. राजेंद्र पाटील – यड्रावकर   यांच्या हस्ते डॉ नितीन बाबर यांच्या अर्थप्रवाह या पुस्तकाचा दि. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी (निमशिरगाव ) जयसिंगपुर येथे प्रकाशन सोहळा होणार आहे. सदर कार्यक्रम इंडियन डेअरी असोसियशनचे माजी अध्यक्ष मा. अरूण नरके यांच्या अध्यक्षतेखाली


 तर कृषिरत्न डॉ संजिव माने, मा. विकास पाटील विस्तार संचालक महाराष्ट्र शासन, मा. मधुकर पाचर्णे (महाव्यवस्थापक आर सी एफ पुणे ) मा. अरुण देशमुख (नेटाफिम पुणे ) आणि मा डी. डी वाकूरे कृषी अधिकारी कोल्हापुर ) तेजस प्रकाशनचे रावसाहेब पुजारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.


डॉ.नितीन बाबर हे सांगोला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ते शेती अर्थकारण, आर्थिक धोरण पर्यावरण आदी विषयावर संशोधनात्मक लिखाण करीत आहेत. सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा बाबुरावजी गायकवाड, उपाध्यक्ष मा ता. ना. केदार, प्रा.मा पी , सी झपके सर तसेच सचिव मा. म. सि झिरपे सर व इतर सर्व संस्था सदस्य यांच्या तसेच 


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मधूसुदन बचूटे साहेब यांच्या प्रेरणेमुळे व महाविद्यालयातील इतर सर्व सहकारी प्राध्यापक व कार्यालयीन अधिक्षक मा पी . एस. शिंदे सर इतर सर्व प्रशासकीय कर्मचारी अशा सर्वाच्या सहकार्यामुळे हे पुस्तक पूर्णत्वाला आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments