google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर तालुक्यात दोन आत्महत्या !

Breaking News

पंढरपूर तालुक्यात दोन आत्महत्या !

 पंढरपूर तालुक्यात दोन आत्महत्या !

पंढरपूर : तालुक्यात आत्महत्येच्या दोन घटना घडल्या असून एक घटना पोहोरगाव येथे तर दुसरी घटना मेंढापूर येथे घडली आहे.


मेंढापूर येथे एका अंगणवाडी मदतनीस असलेल्या विवाहित महिलेने घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे तर पोहोरगाव येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराने आपले जीवन संपवले आहे. पतीच्या मानिसक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अंगणवाडी मदतनीस अश्विनी सोमनाथ पवार या महिलेने घरातच गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. या महिलेचा पती चारित्र्यावर संशय घेत होता.


 अंगणवाडी मदतनीस असल्यामुळे अनेक पालकांशी संपर्क येत होता, त्यांच्याशी बोलावे लागत होते पण याच बोलण्यावर संशय घेतला जात होता. त्यातून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. यातूनच पती दारू पिवून मारहाण देखील करीत होता. या सगळ्या प्रकाराला वैतागून या महिलेने आपल्या घरातच गळफास घेतला आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. 


पोहोरगाव येथे एका ऊस तोडणी मजुराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील २३ वर्षाचा तरुण मजूर ऊस तोडणीसाठी पंढरपूर तालुक्यात आला होता. धीरसिंग उर्फ गौतम पांड्या रहासे असे या तरुणाचे नाव असून त्याने झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. काही दिवसांपूर्वीच तो पोहोरगाव येथे ऊस तोडणी करण्यासाठी आलेला होता. या तरुणाने कशासाठी हे पाउल उचलले हे स्पष्ट झाले नाही. या घटनेची नोंद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments