google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना आजाराने निधन पावलेल्या १५ ९ व्यक्तींचे व १ ९ कलाकारांचे सानुग्रह मदतीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर : अभिजीत पाटील

Breaking News

कोरोना आजाराने निधन पावलेल्या १५ ९ व्यक्तींचे व १ ९ कलाकारांचे सानुग्रह मदतीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर : अभिजीत पाटील

 कोरोना आजाराने निधन पावलेल्या १५ ९ व्यक्तींचे व १ ९ कलाकारांचे सानुग्रह मदतीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर : अभिजीत पाटील



सांगोला / प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोरोना आजाराने निधन पावली आहे . त्या मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास ५० हजार रुपये मदत निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे . यामध्ये कोरोना आजाराने निधन पावलेल्या १५ ९ व्यक्तींचे व १ ९ कलाकारांचे सानुग्रह मदतीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले


 असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली आहे . सांगोला तालुक्यातील कोरोना आजाराने निधन पावलेल्या १५ ९ मयत व्यक्तींचे ऑनलाईन प्राप्त झालेले प्रस्ताव शासनाकडे अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत . त्याचप्रमाणे कोरोना संकटकाळात ज्या कलाकारांचे जीवन कलेवरच अवलंबून होते . 


अशा सांगोला तालुक्यातील १ ९ कलाकारांना सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि . प . सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत . सदरयोजनेचा लाभ घेण्यासाठी लळव- १ ९ विषाणूमुळे निधन झालेल्या मृत नातेवाईकांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याबाबत अवाहान केले होते . त्यानंतर तलाठी कर्मचारी यांच्यामार्फत त्याच्या कुटुंबाला लागणारे सर्व कागदपत्रे तात्काळ देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या .


 तसेच विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने निधन झालेल्या नागरिकांची चौकशी करण्यास सूचना दिल्या होत्या . त्यानुसार मा . जिल्हाधिकारी यांनी स्थापन केलेल्या समिती मार्फत या नागरिकांनी केलेल्या ऑनलाइन अर्जाची तपासणी होऊन योग्य प्रस्तावा संदर्भात चौकशी करून सदरचे अनुदान ऑनलाइन द्वारे मृत पावलेल्या व्यक्तीच्यानिकटवर्तीय नातेवाईकाच्या खात्यावर शासकीय मदत वितरित केले जाणार आहे . 


तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सांगोला तालुक्यातील कोविडमुळे मृत पावलेल्या १५ ९ व्यक्तींच्या निकटवर्तीय नातेवाईकांनी ऑनलाइन अर्ज केले होते . सदरचा प्रस्ताव मा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे . टप्प्याटप्प्याने अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे . . त्याचप्रमाणे कोरोना संकटकाळात लॉकडाऊन मुळे अनेक उद्योग धंदे व्यवसाय बंद झाले होते . 


त्यामुळे आपली कला सादर करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कलाकारांच्या कलेवर ही राज्य शासनाने बंदी घातली होती . त्यामुळे सांगोला तालुक्यातील ओवी गायक लोककलाकार , लोकनृत्य , वाघ्या मुरळी सादर करणाऱ्या १ ९ कलाकारांनाही शासनाकडून सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि . प . सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments