google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : काँग्रेस 'एकला' चलो तो आपण शिवसेनेसोबत 'गेलोच'

Breaking News

सोलापूर : काँग्रेस 'एकला' चलो तो आपण शिवसेनेसोबत 'गेलोच'

 सोलापूर : काँग्रेस 'एकला' चलो तो आपण शिवसेनेसोबत 'गेलोच'


सोलापूर : राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी काँग्रेस पक्ष सध्या 'एकला चलो'च्या भूमिकेत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. आगामी महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात काँग्रेस स्वबळावर तयारी केली आहे. सोलापूर जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्ष मजबूत अवस्थेत आहे. 2 खासदार, 7 आमदार हे भाजपचे आहेत.


त्यामुळे झेडपीच्या निवडणूका महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र येऊन लढवाव्यात अशी मागणी होत आहे. मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी सुरुवाती पासून स्वबळाची भाषा केली आहे. काँग्रेसची जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, किती मतदान काँग्रेसला मिळेल, स्वतःची ताकद काय आहे ही पाहण्याची वेळ आली आहे.


आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात काँग्रेसची मदत झाली, पण आता आमची ताकद अजमावण्याची गरज असून इच्छुक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक  लढवण्याची तयारी करावी, निवडणुकीला उभारण्याचे धाडस दाखवावे अशी भूमिका पत्रकारांशी बोलताना मांडली.


काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांची पत्रकारांनी प्रतिक्रिया घेतली असता,


जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन जर जिल्हा परिषद निवडणूक लढवली तर निश्चित त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील मात्र काँग्रेसची एकला चलो भूमिका पहिल्यापासूनच दिसून येते, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेतून तसे पाहायला मिळते.

 यावेळी प्रत्येकाला आपली ताकद दाखवण्याची वेळ आहे परंतू जिल्ह्यातील परिस्थिती पाहता एकत्रित लढावे त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल. काँग्रेस स्वबळावर लढण्यास आम्ही शिवसेनेसोबत आघाडी करून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवू अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments