google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डोरली ता जत जि सांगली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण मातंग समाज मंदिर बनले कचरा कुंडी कि वखार अड्डा

Breaking News

डोरली ता जत जि सांगली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण मातंग समाज मंदिर बनले कचरा कुंडी कि वखार अड्डा

 डोरली ता जत जि सांगली ग्रामपंचायतीचे आडमापी धोरण             मातंग समाज मंदिर बनले कचरा कुंडी कि वखार अड्डा 

       



   
 

बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय होलार समाज संघटना जत मा रावसाहेब राजाराम हेगडे यांनी डोरली ता जत जिल्हा सांगली येथे मातंग समाज बांधवांना दिली भेट.

        

             मा रावसाहेब राजाराम हेगडे हे जत दौऱ्यावर असताना ,  तालुक्यातील डोरली गावातील मातंग समाज बांधवांना भेट दिली . यादरम्यान समाज बांधवांन सोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.डोरली ग्रामपंचायतीच्या आडमापी धोरणांनमुळे  साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे  समाज मंदिर हे चाळीस वर्षांपूर्वी चे असुन अत्यंत जिर्ण झालेले आहे ,दरवाजा आवजाव घर तुम्हारा , खिडक्या ईकडुन गेले तिकडे वारे , पत्रा येगं येगं सरी तुझे मडके भरी , या म्हणी प्रमाणे सिध्द झाले आहे. समाजमंदिर पाठीमागे उकिरडा व उत्तरेस वाळलेल्या झाडांची लाकडे यामुळे मातंग समाज मंदिर आहे कि नक्की कचरा कुंडी कि नक्की वखारीचा अड्डा असा प्रश्न उपस्थित होत आहे .





     समाज मंदिर शासनमान्य असुन संबंधित डोरली ता जत  ग्रामपंचातीकडुन ठराव अथवा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न  केला जात नाही .मातंग समाजातील बांधवांनी वारंवार मागणी करूनही त्यांना  केराची टोपली दाखवत आहेत , पिव्हींग ब्लाॅक वगळता ,या मातंग समाज वस्तीमधे अन्य  कोणत्याही शासकिय योजना राबविण्यात आलेल्या नाहीत . येणाऱ्या भविष्य काळात


शासकीय योजनांची अंमलबजावणी न झाल्यास आपण बहुजन समाजातील समाजबांधवांना ऐकत्र घेऊन जत तालुका तहसिलदार साहेब यांना निवेदन सादर करणार  आहे असे बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय होलार समाज संघटना जत तालुका अध्यक्ष मा रावसाहेब राजाराम हेगडे म्हणाले. 


             विविध शासकीय योजना , आर्थिक ,शैक्षणिक, राजकीय स्थिती सुधारण्यासाठी वरील विषयावर चर्चा झाली. येथिल नव युवक अत्यंत हुशार ,होतकरु कष्टाळु आहेत  ,सायन्स साईडने शिक्षण घेतले आहेत असे चर्चा अंती  समजले. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपण लवकरच बहुजन समाजातील नवयुवक उद्योजक घडविण्यासाठी लवकरच  बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हा वतीने उद्योजक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तारीख निश्चित नसुन तारीख नियोजन करुन जाहीर केली जाईल  


तरी ही माहिती  जास्तीत जास्त समाजबांधवान पर्यंत पोहचवावी व या सुवर्ण संधीचा बहुजन समाजातील नवयुवकांनी लाभ घ्यावा असे बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय होलार समाज संघटना जत तालुका अध्यक्ष मा रावसाहेब राजाराम हेगडे यांनीआवाहन  केले.


    ‌‌     यावेळी महादेव विठ्ठल संकटे,सागर शामराव वाघमारे, मयुर राजाराम सकटे, निलेश हणमंत सकटे ,मनोज नामदेव पवार,मल्हारी भगवान सकटे ,ईद्रजित वसंत लोखंडे,शिवराज श्रीकांत पवार, चैतन्य श्रीकांत पवार,आनंदा वसंत सकटे ,शशिकांत सुभाष सकटे ईत्यादी मातंग समाज बांधवांव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments