व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने केली आत्महत्या ; पतीविरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल !
सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : दारूच्या नशेत पती वारंवार मारहाण करत असल्याने पतीच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून छताच्या अँगलला महिलेने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली . प्रतिमा सोमनाथ बदडे रा . सनगर गल्ली सांगोला असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे . याप्रकरणी मयत महिलेचे वडील बाळासाहेब कृष्णदेव मायणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
पती सोमनाथ अशोक बदडे रा.सनगर गल्ली सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी , लहूजी वस्ताद नगर पंढरपूर येथील बाळासाहेब कृष्णदेव मायणे यांची मुलगी प्रतिमा हिचा विवाह सांगोला येथील सोमनाथ अशोक बदडे याच्याशी २०१३ मध्ये झाला होता.
सोमनाथ बदडे हा काहीही कामधंदा करत नव्हता तसेच त्यास दारु पिण्याचे व्यसन आहे . चार वर्षापासून सोमनाथ अशोक बदडे हा दारु पिवून पत्नी प्रतिमा हिस शिवीगाळ , दमदाटी करुन मारहाण करीत होता . वारंवारच्या पतीच्या त्रासाला कंटाळून
२ फेब्रुवारी रोजी प्रतिमा बदडे हिने राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली . याप्रकरणी मयत महिलेचे वडील बाळासाहेब कृष्णदेव मायणे यांनी सोमनाथ अशोक बदडे रा . सनगर गल्ली सांगोला ता . सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
0 Comments