google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अरे वा..! दोन डोस सर्वांना देणारं 'हे' ठरलं पहिलं राज्य; लसीकरण केंद्रं होणार बंद

Breaking News

अरे वा..! दोन डोस सर्वांना देणारं 'हे' ठरलं पहिलं राज्य; लसीकरण केंद्रं होणार बंद

 अरे वा..! दोन डोस सर्वांना देणारं 'हे' ठरलं पहिलं राज्य; लसीकरण केंद्रं होणार बंद 



देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण आता गतीने कमी झाले आहेत. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, भारतात वेगाने सुरु असलेल्या लसीकरणामुळे रुग्णसंख्या कमी झाली आहे.


या दरम्यानच आता भारतात सुरु असलेल्या लसीकरण अभियानासंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा देशातील असं पहिलं राज्य ठरलं आहे, ज्याठिकाणी 100 टक्के वयस्कर लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यामध्ये 18 वर्षांवरील 11.66 लाख लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.


हा टप्पा गाठण्यासोबतच राज्यातील आरोग्य सेवांना आता कोरोना लसीकरणासाठी उघडण्यात आलेली केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ आता गोव्यामध्ये सामान्य लसीकरण कार्यक्रमाअंतर्गतच कोरोनाचे लस दिले जातील. गोव्यातील आरोग्य अधिकारी डॉ. इरा अलमीडा यांनी म्हटलंय की, गोवा राज्याने कोरोना लसीकरणामध्ये 100 टक्के लोकांना दोन्ही डोस दिले आहेत.


आता प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे सर्व कोरोना लसीकरण केंद्रांना बंद केलं जाईल. तसेच ही प्रक्रिया आता सामान्य लसीकरण अभियानामध्येच समाविष्ट केली जाईल. कोरोनाचे लसीकरण सुरु राहिल मात्र, सामान्य लसीकरणामध्येच ते होईल.


गोव्यामध्ये कोरोना लसीचा पहिला डोस 100 टक्के नागरिकांना सप्टेंबरमध्येच देऊन पूर्ण झाला होता. तसेच राज्याने डिसेंबर 2021 पर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये ते ध्येय गाठण्यात दिरंगाई झाली आहे.

Post a Comment

0 Comments