विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू ; सांगोला तालुक्यातील अकोला येथील घटना
सांगोला : सांगोला तालुक्यातील अकोला येथील दीपक विलास खटकाळे या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे . शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली आहे .
घरातील नळाला पाणी येत नसल्याने पाण्याची मोटर सुरु करण्यासाठी दीपक गेला असता शॉक बसून तो मृत्युमुखी पडला . त्याला उपचारासाठी सांगोला येथील खाजगी दवाखान्यात त्याला आणले असता उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे सांगण्यात आले दीपक हा पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरीस होता . मुलगी बघण्यासाठी तो शुक्रवारी अकोला येथे गावी आला होता .
आज पहाटेच त्याच्यावर काळाने झडप घातली.त्याच्या पश्चात आई , वडील एक भाऊ , दोन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे . शिवकृपा कृषी उदयोग केंद्र अकोलाचे मालक दिनेश खटकाळे यांचे ते मोठे बंधू होते . दीपक यांचा स्वभाव प्रेमळ आणि मनमिळावू होता . त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच अकोला वासूद गावात परिसरात शोककळा पसरली .
0 Comments