सांगोला येथे रेल्वे भुयारी बोगद्या च्या कामाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न
सांगोला /प्रतिनिधी बऱ्याच दिवसापासून सांगोला शहरातील मिरज रोड येथील रेल्वे गेट नंबर ३२येथे भुयारी मार्ग व्हावा अशी सांगोला शहरातील व तालुक्यातील नागरिकांची मागणी होती अखेर सांगोला गेट नं ३२येथे रेल्वे भुयारी मार्ग बोगद्याच्या कामाचे भूमीपूजन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न झाले
सोलापूर -कोल्हापूर हा रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते मिरज रोड रेल्वे गेट 32 वारंवार येणाऱ्या रेल्वे गाड्या यामुळे रेल्वे क्रॉसिंग गेट येथे मोठी टॅफिक होत होती रेल्वे गेट क्रॉसिंग साठी जवळ जवळ 3 कोटी रुपये खर्चाचे४ मिटर रुंदी व ४.५ मिटर उंचीचे दोन जाणे येणे साठी स्वतंत्र बोगदे होणार असल्याने आता वाहतुकीचे कोंडी होणार नाही असे यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले
यावेळी जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड, तानाजीकाका पाटील , रफिक नदाफ, सोमनाथ गुळमिरे, आनंदकाका घोंगडे, संजय काशीद, योगेश खटकाळे, शिवाजी घेरडे तसेच रेल्वेचे अधिकारी डी एन मोर्य, प्रसाद जोशी व नागरिक उपस्थित होते.
0 Comments