google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील जलसंधारण कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून १९ कोटी रुपये मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

सांगोला तालुक्यातील जलसंधारण कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून १९ कोटी रुपये मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील

 सांगोला तालुक्यातील जलसंधारण कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून १९ कोटी रुपये मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील

       घेरडी व अकोला येथील साठवण तलावांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न.


सांगोला (वार्ताहर) : सांगोला तालुक्यातील जलसंधारण विभागाकडील विविध कामांकरिता सोलापूर जिल्हा नियोजन समितीकडून १९ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली यामधील अकोला व घेरडी येथील साठवण तलावांच्या  


कामाचे भूमिपूजन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये व शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी घेरडीच्या सरपंच सुरेखा पुकळे,सोमा आबा मोटे, अनिल खटकाळे,प्रा संजय देशमुख, धनंजय काळे,चंद्रकांत जांगळे,जलसंधारणचे उपविभागीय अभियंता विनायक खरात,यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

सांगोला तालुक्यातील महिम क्र.३ येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधणे कामासाठी ३ कोटी ६२ लक्ष, घेरडी साठवण तलावासाठी ३ कोटी ९१ लक्ष, अकोला साठवण तलावासाठी ४ कोटी ३६ लक्ष, गौडवाडी साठवण तलावासाठी ३ कोटी ८८ लक्ष व राजगेवाडी (डोंगरगाव) साठवण तलावासाठी ३ कोटी ५२ लक्ष असे एकूण १९ कोटी ३१ लक्ष रुपये या कामांसाठी मंजूर झाले आहेत.


 जिल्हा नियोजन समितीतून जलसंधारण विभागाच्या कामांसाठी सांगोला तालुक्याला सर्वाधिक निधी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंजूर केल्याबद्दल आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांचे आभार मानले पावसाळ्याच्या अगोदर ही सर्व कामे पूर्ण केली जाणार असून येणाऱ्या पावसाळ्यात या तलावांमध्ये मुबलक पाणी साठा होणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Post a Comment

0 Comments