सोलापूर जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर यांच्या लोकसहभाग माध्यमातून ता. सांगोला ” गाव तेथे उत्कृष्ट तलाठी कार्यालय उभारणी पैकी “मु.पो.उदनवाडी येथे तलाठी वास्तु निर्माण शुभारंभ सोहळा संपन्न”..
मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी “तहसील कार्यालय सांगोला तालुका -उत्कृष्ट सुसज्ज तलाठी कार्यालय उभारणी वास्तू लोकार्पण कार्यातून प्रेरणा घेऊन” सांगोला तालुका प्रत्येक गावातील तलाठी जन सम्पर्क कार्यालय नुतनीकरण आणि वास्तु उभारणी प्रेरित करताना ,, आज सांगोला तालुक्याचे तहसीलदार अभिजित पाटील आदेशानुसार उदनवाडी गावाच्या तलाठी श्रीमती लोखंडे यांच्या मागणी पाठपुरावा मागणीनुसार
आज मु.पो.उदनवाडी ता.सांगोला, १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर नवीन तलाठी कार्यालय भुमिपूजन कार्यक्रम प्रांत अधिकारी आप्पासाहेब समिंद्रे यांच्या शुभ हस्ते ,नायब तहसीलदार बडवे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रांत अधिकारी यांचं स्वागत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते-फुले शाहू,आंबेडकर आश्रम शाळा संस्थापक श्री बालेखान शेख आणि सांगोला नायब तहसीलदार मा.बडवे यांचं स्वागत उदनवाडी सर्कल सरोदे भाऊसाहेब आणि तलाठी लोखंडे याच्या हस्ते स्वागत समारंभ पार पडला.
यावेळी सन्माननीय प्रमुख पाहुणे यांनी तलाठी कार्यालय वास्तुचे भूमीपूजन करून शुभारंभ केला यावेळी उपस्थित सर्कल सरोदे, तलाठी लोखंडे मदम,ज्येष्ठ कार्यकर्ते हरी सावळा वलेकर,सामाजिक कार्यकर्ते संजय शामराव गाडे सरचिटणीस सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), मा.चेअरमन दत्तात्रय बंदवडे,राजवाडे तलाठी, विकास माळी तलाठी,इत्यादी ग्रामस्थ पूजन, शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी bhimrajnews.com माहिती देताना प्रांत अधिकारी आप्पासाहेब समिंद्रे यांनी सांगितले की जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदर्शत या कार्यातून ही तलाठी कार्यालय उभारताना लोकसहभाग महत्वाचा आणि सांगोला तहसीलदार अभिजित पाटील आणि मी स्वतः याकडे स्वतः लक्ष देऊन या जनतेच्या सुविधा पुरवणे हे आमचं आद्य कर्तव्य समजतो.यासाठी सम्बधित गावाचे तलाठी श्रीमती लोखंडे मॅडम स्वतः लक्ष देऊन हे कार्य करतील यासाठी अडचण आल्यास त्यांनी कळवावे असेही त्यांनी सांगितले
.कार्यक्रम व्यस्त असल्याने स्वतःमा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे या शुभारंभ प्रसंगी येणार होते पण त्यांचा प्रतिनिधी या नात्याने हा कार्यक्रम आता सुरुवात केली आहे.आणि नूतन वास्तु लोकार्पण सोहळ्यासाठी आपण स्वतः मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना या ठिकाणी आणण्याचे प्रयत्न करू असे सांगितले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद केंगार कोतवाल, मारुती गाडे ग्रामपंचायत शिपाई, सुनील वलेकर-पाटील,वैभव चवरे,मधु सरगर क्लार्क ग्रामपंचायत याचं मोलाचं सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगोला तालुका चिटणीस -सामाजिक कार्यकर्ते मा.संजय शामराव गाडे यांनी केलं.यावेळी उदनवाडी ग्रामस्थ- नागरिकांच मोलाचं सहकार्य लाभले

0 Comments