google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुर जिल्ह्यातील 'इतके' विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्ये, जिल्हा प्रशासनाचे संपर्क साधण्याचे आवाहन; यादी पाहा

Breaking News

सोलापुर जिल्ह्यातील 'इतके' विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्ये, जिल्हा प्रशासनाचे संपर्क साधण्याचे आवाहन; यादी पाहा

 सोलापुर जिल्ह्यातील 'इतके' विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्ये, जिल्हा प्रशासनाचे संपर्क साधण्याचे आवाहन; यादी पाहा 

रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. युक्रेन रणभूमीत सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ३१ विद्यार्थी अडकले आहेत. हे सर्वजण मेडिकल शिक्षणासाठी युक्रेन येथे गेले आहेत. याबाबतची अधिकृत माहिती सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.


युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या नियंत्रण कक्षाला संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.


सोलापूर जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, so दूरध्वनी 0217- 2731012 तसेच rdcsolapur@gmail.com आणि ddmo.rfsol-mh@gov.in यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


अडकलेले वैद्यकीय विद्यार्थी –

सोलापूर शहर – 5 (मुले 2, मुली 3)

सांगोला – 4 (मुले 2, मुली 2)

पंढरपूर – 9 (मुले 6, मुली 3)

मोहोळ – 2 (मुले 2)

मंगळवेढा – 5 (मुले 4)

बार्शी – 3 (मुले 2, मुली 1)

माढा – 1 (मुले 1)

दक्षिण सोलापूर – 1 (मुलगी 1)

करमाळा – 1 (मुले 1)

Post a Comment

0 Comments