सांगोला शहर व तालुक्यातील २९ हजार २४८ बालकांनी घेतला पोलिओ डोस
सांगोला (प्रतिनिधी) :सांगोला शहर व तालुक्यात २५९ बुथवरुन ६४४ कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ३१ हजार ६४९ पैकी २९ हजार २४८ बालकांना पोलिओ मात्रा देण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सिमा दोडमणी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम फुले यांनी दिली आहे.
सांगोला शहरात ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका यांच्यावतीने ६४ कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने २३ बुथवर पल्स पोलिओ लस उपलब्ध करण्यात आली होती. यामध्ये ४ हजार ८२७ पैकी ३ हजार बालकांना ९५२ बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली आहे. शहरात एस.टी. बस स्थानक,ग्रामीण रुग्णालय, आठवडा बाजार अशा प्रमुख रहदारीच्या ठिकाणी पोलिओ बुथ उभा करण्यात आले होते. सांगोला ग्रामीण रुग्णालयात सकाळी लसीकरण बुथचे उद्घाटन करुन लस पाजली.
सांगोला तालुक्यातील गग्रामीण भागात तालुका आरोग्य विभागातंर्गत ६ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत एकूण १०२ गाव व वाड्यावस्त्यावर २३६ बुथवरुन व ट्राझींक टीम तसेच मोबाईल टीमव्दारे ५८० कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने व सुपरवायझर यांच्या
मदतीने २६ हजार ८२२ पैकी २५ हजार २९६ बालकांना पोलिओ मात्रा देण्यात आली. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील कोणताही बालक पोलिओ मात्रा पासून वंचित राहू नये तसेच बुथवर लस कमी पडू नये यासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील लसीकरण बुथ केंद्रास भेट दिली. व बालकांना पोलिओची मात्रा दिली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सिमा दोडमणी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोग्य साहाय्यक जे. एस. काझी, दत्तात्रय जाधव, सी. एस. साळुंखे, विकास बनसोडे, मिलींद सावंत यांनी तालुक्यातील लसीकरण बुथवर भेटी देवून पाहणी केली. यामध्ये कोणताही बालक पोलिओ लस पासून वंचीत राहणार नाही अशा सूचना केल्या.
रविवारी शहर व तालुक्यात रहदारीच्या ठिकाणी आरोग्य केंद्र, उपकेंद्र अंगणवाडी शाळा आदी ठिकाणी पोलिओ बुथ नेमूण लस उपलब्ध करून दिली होती. असे ही डॉ. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सिमा दोडमणी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम फुले यांनी सांगितले आहे.

0 Comments