रशिया- युक्रेन युद्धात अणुबॉम्बची एन्ट्री; चिंतेचे वातावरण
रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता रशिया- युक्रेन युद्धात अणुबॉम्बची एन्ट्री झाली आहे. बेलारुसने रशियाला आपल्या देशात अण्वस्त्र तैनात करण्यास परवानगी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युक्रेनच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
रशिया आणि युक्रेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याचे पहायाला मिळत होते.
सध्या या दोन देशांतील संघर्ष आता टोकाला पोहचला आहे. वारंवार रशियाकडून युक्रेनवर हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत रशियाकडून केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
दरम्यान, रशियाकडून केल्या जात असलेल्या युक्रेनवरील वारंवार हल्ल्याबाबत जगभरातून रशियाचा विरोध केला जात आहे. आता रशिया- युक्रेन युद्धात अणुबॉम्बची एन्ट्री झाली आहे. रशियाने युद्ध समाप्तीची घोषणा करून सैन्य माघारी बोलवावे,
अशी मागणी युरोपीयन रा्ष्ट्रांकडून करण्यात येत आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आंतरराष्ट्रीय कायदे तोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांना धडा शिकवावाच लागेल. तिसरे महायुद्ध देखील होऊ शकते, असा इशारा दिला आहे. त्यामुळे वातावरण आणखी चिघळत चालले आहे.

0 Comments