google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 "ऐ बिड्डा...! ये मेरा अड्डा...!" सोलापूर झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 'पुष्पा' म्हणतात......

Breaking News

"ऐ बिड्डा...! ये मेरा अड्डा...!" सोलापूर झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 'पुष्पा' म्हणतात......

 "ऐ बिड्डा...! ये मेरा अड्डा...!" सोलापूर झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 'पुष्पा' म्हणतात......

सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी एका ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्याने पत्रकारांसमोर केली . 


ते तसे का म्हणाले याची माहिती घेतली असता बऱ्याच गोष्टी समोर आल्या.शिक्षण विभागात असा कोणता टेबल नाही जिथं आर्थिक व्यवहार न होता कामे होत नाहीत. काही महाठग तर अशी आहेत अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर जाऊन पैसे देऊन फाईलवर सही आणतात म्हणे. सध्या प्राथमिक  शिक्षण विभागात एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे या विभागातील राजीव गाडेकर, संजय कांबळे,तजमुल मुतवल्ली या तिघा कर्मचाऱ्यांची.


 हे तिघेच सध्या प्राथमिक शिक्षण विभाग चालवतात असं काहीसं चित्र आहे.वर्षानुवर्ष हे सर्व एकाच विभागात आणि एकाच टेबलावर कसे काय? हासुद्धा संशोधनाचा विषय आहे.  राजीव गाडेकर यांना तर अनेक वर्षापासून शिक्षण विभागातील टेबल सुटत नाही. गाडेकर यांनी एकाच टेबलावर तळ ठोकून बरीच माया मिळवली असल्याची चर्चा जिल्हा परिषद मध्ये आहे. 


 तजमुल मूतवल्ली हे कार्यालयीन अधिक्षक आहे की, जिल्हा परिषदेमधील कारकून? हेच कुणाला समजत नाहीआपल्या टेबलावर कमी आणि हातात कागद घेऊन इकडे तिकडे जास्त फिरत असल्याचं चित्र जिल्हा परिषदेत पाहायला मिळतं. या पूर्वीचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांचं बरंच देणंघेणं ही सर्व कामे मुतवल्ली रावसाहेब पहात होते


 असे ऐकण्यास मिळते. त्या सर्वांमध्ये संजय कांबळे हे तर जिल्हा परिषदेमध्ये प्रसिद्ध आणि वादग्रस्त असलेलं व्यक्तिमत्व.कुठल्या अधिकाऱ्याला कसे पैसे पैसे मिळवून द्यायचे, आपला खिसा कसा भरायचा यामध्ये कांबळे माहीर आहेत. मागील काही दिवसांपूर्वी कांबळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये सरळ सरळ ते पैसे मागत असल्याचे ऐकण्यास मिळते.


 नुकत्याच झालेल्या आंतरजिल्हा शिक्षक  समायोजनमध्ये कांबळे यांनी स्वतःसह अधिकाऱ्यांनाही बक्कळ माल कमवून दिल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेमध्ये रंगली आहे.राजीव गाडेकर, तजमुल मुतवल्ली, संजय कांबळे यांच्यासह आणखी तिघे असे सात जण दर सहा महिन्याला ट्रीपला जातात. ही ट्रीप साधीसुधी नसते, थेट विमानाने असते. या यापूर्वीची ट्रीप बेंगलोर, उटी, कडप्पा, म्हैसूर अशी झाली होती त्यानंतर आता थेट हिमाचल प्रदेशात मनाली. 


तीसुद्धा विमानाने... एवढा पैसा या कर्मचाऱ्यांकडे येतो कुठून असा प्रश्‍न जिल्हा परिषदेतील प्रत्येक कर्मचारी, सदस्य पदाधिकाऱ्यांना पडला आहे. संजय कांबळे यांच्या त्या व्हायरल क्लिप बाबत पुढे काय झाले, तो अधिकारी-कर्मचाऱ्यांना कसा मॅनेज करतो, नेमकी ती क्लिप काय होती पहा पुढील भागात.

Post a Comment

0 Comments