google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बागायतदारांचे बंगले ' लक्ष्मीविनाच ' ; लग्नासाठी पोरं पुण्यात कामाला .. मुलींना हवाय सिटीतला नवरा : वर्षभराच्या पगाराहून अधिक उत्पन्न एका पिकात

Breaking News

बागायतदारांचे बंगले ' लक्ष्मीविनाच ' ; लग्नासाठी पोरं पुण्यात कामाला .. मुलींना हवाय सिटीतला नवरा : वर्षभराच्या पगाराहून अधिक उत्पन्न एका पिकात

बागायतदारांचे बंगले ' लक्ष्मीविनाच ' ; लग्नासाठी पोरं पुण्यात कामाला .. मुलींना हवाय सिटीतला नवरा : वर्षभराच्या पगाराहून अधिक उत्पन्न एका पिकात

करमाळा नोकरी आहे का ? पॅकेज किती ? शहरात राहणार का ? असे एक ना अनेक प्रश्न मुलींकडून विचारले जात असल्याने लग्नाचे वय होऊनसुद्धा शेतकऱ्यांच्या मुलाची लग्नगाठ बांधली जात नसल्याने शेतकऱ्यांच्या मुलांवर वयाची ३०-३५ वर्षे ओलांडूनही लग्नाविना राहण्याची वेळ आली आहे . यासाठी शेतकऱ्यांनी आता मुलांना कंपनीमध्ये नोकरीस पाठवायला सुरु केलं आहे . वर्षभरातील त्यांच्या पगारांची रक्कम आणि एका पीकात तेवढेच उत्पन्न निघते हे वास्तव आहे .


 करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसरात बागायती शेती आहे . मुबलक पाण्यामुळे ऊस व केळी ही किमती पिके घेतली जातात . त्यातून लाखो रुपयांची कमाई शेतकऱ्यांना होत आहे . त्यातून शेतातच आलिशान बंगले बांधले आहेत . या बंगल्यातून सर्व सुखसोयी आहेत . शिवाय आलिशान गाड्या दिमतीला आहेत .  वयात आलेल्या आपल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे . कुगाव या सालसे , वांगी , कंदर , बिटरगाव वांगी , केत्तूर , पारेवाडी , चिखलठाण , बॅकवॉटर भागासह साडे , जातेगाव , कोर्टी , केम आदी गावखेड्यांतून वयात आलेली मुले लग्नापासून आहेत . 


मुलींना ग्रामीण भागात संसार करण्याची आवड वा इच्छा नाही . ग्रामीण भागातील मुलीसुद्धा ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरात लग्न करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे . मुलगा पदवीधर असला , तरी त्यास चांगली बागायती व उत्पन्न देणारी शेती असली , तरी मुलींना शेतकरी नवरा नकोय . शहरात राहणारा , नोकरी करणारा मुलगा पसंत करणाऱ्यांची संख्या मोठी आहे . यामुळे ३५ ते ४० वर्षांचे वय होऊनसुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न ही मोठी समस्या निर्माण झाली आहे .


चौकटः अशी स्थिती केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रभर आहे . नोकरीमध्ये मिळणाऱ्या पैशात आणि शहरात राहण्याच्या हौसेखातर ग्रामीण भागातील मुलींना शेतकरी मुलगा पसंत नाही , असं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे . अगदी शेतकरीराजाही आपली मुलगी नोकरदाराला द्यावी , यावर ठाम असतात . मग अशा मुलांनी करायचं काय ? असाही सवाल बोहल्यावर चढू पाहणाऱ्या युवकांमधून होऊ लागला आहे .


चौकटः शेतकऱ्यांच्या मुलांचे वय होऊनही त्यांची लग्ने जमत नाहीत . ही मोठी समस्या शेतकरी कुटुंबात असून , शेतकरी साया जगाचा पोशिंदा आहे . लॉकडाऊनमध्ये सर्व क्षेत्रे बंद होती , पण शेतकऱ्यांची शेती सुरुच होती . याचा विचार करून याविषयी प्रबोधन होणे गरजेचे आहे . - राजेंद्र बारकुंड , शेतकरी , चिखलठाण दोन पुतण्यांचे वय होऊनही लग्न जमत नसल्याने नाइलाजाने पुण्याला कंपनीत कामाला पाठवले आहे . आता लग्न जमतील अशी आशा आहे . मला जमीन एकर आहे अन् मुलांला १६ हजार पगार आहे . त्यापेक्षा शेतीत उत्पन्न जास्त मिळते . - आण्णासाहेब सुपनवर , खांबेवाडी लग्न जमत नसल्याने अनेक युवकांचे मानसिक स्वास्थ्य खराब होत आहे . वृध्द आईवडिलांना चिता लागून राहिल्याने त्यांना शुगर , रक्तदाबाचे आजार जडले आहेत . अनेक युवक व्यसनी व वाम मार्गाला लागले आहेत . -डॉ . दिलीप अडसूळ , करमाळा

Post a Comment

0 Comments